CoronaVirus : लक्षणे नसूनही ‘होम क्वारंटीन’ची परवानगी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:20 AM2020-08-04T10:20:46+5:302020-08-04T10:21:24+5:30

कोरोनाची लक्षणे नसतील, तर होम क्वारंटीनचा पर्याय राज्यभरातील रुग्णांना आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिला आहे; मात्र अकोल्यात हा नियम लागूच नसल्याचे वास्तव सद्यस्थितीवरून निदर्शनास येत आहे.

CoronaVirus: patients without symptoms Home quarantine not allowed in Akola | CoronaVirus : लक्षणे नसूनही ‘होम क्वारंटीन’ची परवानगी नाही!

CoronaVirus : लक्षणे नसूनही ‘होम क्वारंटीन’ची परवानगी नाही!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाची लक्षणे नसतील, तर होम क्वारंटीनचा पर्याय राज्यभरातील रुग्णांना आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिला आहे; मात्र अकोल्यात हा नियम लागूच नसल्याचे वास्तव सद्यस्थितीवरून निदर्शनास येत आहे. शिवाय, नातेवाइकांनाही रुग्णाच्या भेटीची मुभा नसल्याने अनेक रुग्ण जीएमसीत दाखल होण्यास घाबरत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे; मात्र अशा परिस्थितीतही कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांना कुठलीही लक्षणे नसतील, तसेच रुग्णाच्या घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल, तर रुग्णाला स्वत:च्या घरातच होम क्वारंटीन ठेवता येते. राज्यातील इतर शहरांमध्ये कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे; परंतु हा नियम अकोल्यातील अशा रुग्णांना लागू नसल्याचे वास्तव आहे. अकोल्यात रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तरी त्यांना रुग्णालयात किंवा इन्स्टिट्युशनल क्वारंटीन केले जाते. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयावरील ताणदेखील वाढला आहे. परिणामी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णांकडे लक्ष देणेही होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.


रुग्णांकडे उपलब्ध सुविधांची चौकशीही होत नाही!
वैद्यकीय अधिकाºयांच्या मते, कोरोनाची लक्षणे नसणाºया रुग्णांच्या घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असायला हवी. स्वतंत्र स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे; मात्र या विषयी रुग्णांना साधी विचारणाही होत नसल्याचे वास्तव आहे.


आरोग्य विभागावर ताण
मृत्युदर रोखण्यासाठी कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष असते. त्यामुळे ज्या रुग्णांना कुठलेच लक्षणे नाहीत, अशांना केवळ वॉर्डात ठेवले जाते. त्यामुळे त्यांना सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता, दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी अनेक रुग्णांमधून संतापही व्यक्त होतो. त्याचा सर्वांगीण ताण वैद्यकीय कर्मचाºयांवर येतो.


इतर जिल्ह्यात तसे परिपत्राक काढले आहेत; मात्र अकोल्यात तशी कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही. तसेच रुग्णाच्या घरी संपूर्ण व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती संकलित करूनच त्याला होम आयसोलेशन केल्या जाते. वरिष्ठांकडून तशा मार्गदर्शक सूचनादेखील मिळाल्या नाहीत.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्र.अधिष्ठाता, अकोला

 

Web Title: CoronaVirus: patients without symptoms Home quarantine not allowed in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.