CoronaVirusinAkola : लॉकडाऊन नाही; पण स्वयंशिस्त वाढवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:47 AM2020-09-16T10:47:41+5:302020-09-16T10:47:50+5:30

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांमध्ये शिस्त आणि स्वयंशासन आवश्यक आहे.

CoronaVirusinAkola: No lockdown; But increase self-discipline! | CoronaVirusinAkola : लॉकडाऊन नाही; पण स्वयंशिस्त वाढवा!

CoronaVirusinAkola : लॉकडाऊन नाही; पण स्वयंशिस्त वाढवा!

Next

अकोला : अकोला शहरात कोरोनाचा वाढता प्रसार आणि कोरोनाबळीचे सत्र लक्षात घेता पुन्हा एकदा लॉकडाऊन केले जाणार असल्याच्या अफ वा पसरत आहे. सोशल मीडियावरही फेक मसेजसही व्हायरल होत आहेत; मात्र आता लॉकडाऊन होणार नाही. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांमध्ये शिस्त आणि स्वयंशासन आवश्यक आहे.
अनलॉक ४ ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे; मात्र त्याचवेळी कोरोनाचा उद्रेक वाढला असल्याने आता पुन्हा लॉकडाऊन होणार का, या शंकेने हातावर पोट असणाऱ्यांसह सर्वसामान्य धास्तावले आहेत. प्रत्यक्षात मात्र लॉकडाऊनऐवजी स्वयंशिस्तीला अधिक महत्त्व देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे. वाढत्या गर्दीमध्ये मास्कचा वापर नाही, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येला नियंत्रित करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणांच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याचीही साथ आवश्यक ठरत आहे.


आरोग्य यंत्रणेसोबतच प्रशासनाची जबाबदारी वाढली
गेल्या पंधरवड्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसोबतच प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. येणाºया काळात अशी दमछाक टाळण्यासाठी आता बेड मॅनेजमेंट, कॉन्टक्ट ट्रेसिंग, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची संख्या आणखी वाढविणे, लक्षणे दिसताच चाचणी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करणे यावर अधिक भर देण्याची गरज भासणार आहे.
 
आॅक्सिजनची आणीबाणी कायमच!

सध्या जिल्ह्यात आॅक्सिजनची मागणी तिपटीने वाढली असून, त्यामध्ये आणखी वाढ होत आहे. सोमवारी संध्याकाळी आॅक्सिजनची व्यवस्था असलेल्या खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता, तर रात्री एमआयडीसीमधील आॅक्सिजनच्या प्लांटमध्ये काही काळ बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे आॅक्सिजनची आणीबाणी निर्माण होते, अशी स्थिती होती; मात्र निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व जीएमसीच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच परिस्थिती हाताळून आॅक्सिजनची तातडीने व्यवस्था केली. रात्री उशिरा अखेर तो प्लांट सुरळीत झाल्याने सर्वांनी नि:श्वास सोडला.
 
मास्क अनिवार्य, चेंबरच्या बैठकीतही एकमत
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता शहरातील प्रत्येक व्यापाºयाने आपल्या प्रतिष्ठानात येणाºया ग्राहकाला मास्क अनिवार्य करावा तसेच आपणही मास्क वापरावा. मास्क नसलेल्या ग्राहकांना प्रतिष्ठानात प्रवेश देऊ नये तसेच वस्तूची विक्रीही करू नये, या निर्णयावर विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या बैठकीत एकमत झाले आहे. दुकानदारालाही फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्याच्या सूचना चेंबरने व्यापाºयांना दिल्या आहेत.

Web Title: CoronaVirusinAkola: No lockdown; But increase self-discipline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.