लाचखोर जिल्हा व्यवस्थापक, कंत्राटी कर्मचाऱ्याची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 01:52 PM2019-08-23T13:52:05+5:302019-08-23T13:52:08+5:30
दोघांना रंगेहात अटक केल्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्याायालयाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली.
अकोला: शैक्षणिक कर्जाची फाइल मुंबई मुख्य कार्यालय येथे पाठविण्याकरिता ७ हजार रुपये लाचेची मागणी करणाºया मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा लाचखोर जिल्हा व्यवस्थापक संजय पहुरकर आणि कंत्राटी कर्मचारी शेख सादिक शेख गुलाम या दोघांना रंगेहात अटक केल्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्याायालयाने दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी केली.
पातूर येथील १९ वर्षीय तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, शैक्षणिक कर्ज मंजुरीची फाइल मुंबई मुख्य कार्यालय येथे पाठविण्याकरिता मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक संजय बळीराम पहुरकर, रा-हिंगणा रोड कौलखेड, शेख सादिक शेख गुलाम रा. गणेशपूर ता. खामगाव या दोघांनी ७ हजार रुपये लाचेची मागणी केली होती; मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांच्यातील लाच घेण्याची रक्कम व जागा ठरल्यानंतर तक्रारकर्त्याकडून ४ हजार रुपयांची लाच घेताना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक संजय बळीराम पहुरकर आणि शेख सादिक शेख गुलाम रा. गणेशपूर, ता. खामगाव या दोघांना अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.