कापसाचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:21 PM2019-02-05T13:21:27+5:302019-02-05T13:21:42+5:30
अकोला : कापसाचे दर कोसळल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील शेतकºयांकडे ५० टक्केवर कापूस पडून आहे.
अकोला : कापसाचे दर कोसळल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील शेतकºयांकडे ५० टक्केवर कापूस पडून आहे. सोमवारी जिल्ह्यात प्रतिक्ंिवटल ५,४५० रुपयांपर्यंत दर होते. यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी दर मिळत नसल्याने मुख्यत्वे कापूस उत्पादकांसह कोरडवाहू क्षेत्रात इतर पिके घेणाºया शेतकºयांची प्रचंड आर्थिक कोंडी होत आहे. आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी शासनाने यावर्षी उशिरा खरेदी केंद्र सुरू केली. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावून खरेदी करण्यात येत असल्याने शेतकºयांना अपेक्षित दर मिळत नाहीत. परिणामी, शेतकºयांना व्यापाºयांनाच कापूस विकावा लागतो. यावर्षी बºयापैकी उत्पादन झाल्याचे तज्ज्ञाचे मत आहे; पण जवळपास ५० टक्के कापूस शेतकºयांकडेच पडून आहे. मागील दोन वर्षे कपाशीवर गुलाबी बोंडअळीने हल्ला केल्याने मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकरी प्रंचड आर्थिक अडचनीत सापडला होता. म्हणूनच यावर्षी शेतकºयांना अपेक्षित दर मिळतील, अशा आशा होती; परंतु दर सुधारले नाहीत. सुरुवातीला बºयापैकी म्हणजे ६ हजार रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत कापसाचे दर गेले होते. तथापि, त्यावेळी कापसाची वेचणी सुरू होती; तसेच त्यामध्ये आर्द्रताही होती. तुरळक शेतकºयांनी त्यावेळी कापूस विकला; पण त्यानंतर दर कोसळले ते आजतागायत सुधारले नाहीत.
गतवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला पाऊस नसल्याने काही शेतकºयांना उशिरा कपाशीची पेरणी करावी लागली. दोन वेळा खंडही पडला; पण अशाही परिस्थितीत भारी काळ््या शेतात बºयापैकी कपाशीचे पीक झाले. बोंडअळीवरही नियंत्रण मिळाल्यानेही उत्पादनात भर पडल्याचा कृषी तज्ज्ञांचा दावा आहे. सध्या तरी शेतकºयांनी दर वाढतील, या प्रतीक्षेत कापूस विकला नाही. फरदडचा कापूस काही ठिकाणी वेचणी सुरू आहे. आता ती केवळ दरवाढीची प्रतीक्षा आहे; परंतु दर वाढतील की नाही, याबाबत साशंकता असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
कपाशीचे दर सोमवारी प्रतिक्ंिवटल ५,४५० ते ५,५०० रुपये होते. सध्या हे दर स्थिर आहेत; पण भविष्यातील दरवाढ ही चीन व अमेरिकेच्या व्यावसायिक संबंधावर अवलंबून आहे.
- बसंत बाछुका,
कापूस उद्योजक,अकोला.