कापसाचे भाव वाढण्याचे संकेत!
By Admin | Published: November 22, 2014 11:34 PM2014-11-22T23:34:54+5:302014-11-22T23:34:54+5:30
देशात आतापर्यंत २0 लाख गाठींची खरेदी.
अकोला: देशात चालू हंगामात आतापर्यंत कापसाची सर्वाधिक खरेदी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)ने केल्याचा, खासगी बाजारावर परिणाम झाल्याने, खासगी व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी सुरू केल्यामुळे, कापसाचे दर वाढण्याचे संकेत मिळत आहेत. देशात आतापर्यंंत २0 लाख गाठी कापूस खरेदी झाला असून, त्यापैकी सर्वाधिक कापूस सीसीआयने खरेदी केला आहे.
महाराष्ट्रात यावर्षी सुमारे ८0 लाख गाठी कापसाचे उत्पादन अपेक्षित असून, शेतकर्यांनी कापूस विक्रीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत राज्यात जवळपास दीड लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे. यावर्षी सीसीआयचा अभिकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ राज्यात प्रथमच कापसाची खरेदी करीत आहे. पणन महासंघाने राज्यात आणि सीसीआयने देशात थेट कापूस खरेदीचा धडाका लावला आहे. राज्यात आतापर्यंंत खरेदी करण्यात आलेल्या दीड लाख गाठींपैकी सुमारे ७0 ते ७५ टक्के कापूस एकट्या सीसीआयने खरेदी केला आहे. उर्वरित २५ ते ३0 टक्के कापूस खासगी व्यापार्यांनी खरेदी केला आहे. सीसीआय कापसाची खरेदी करीत असल्याने, खासगी बाजारात कापसाचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर देशातील जवळपास सर्वच कापूस उद्योजक, व्यापार्यांनी कापूस खरेदी करण्यास सुरू वात केली असल्याने, नजिकच्या काळात कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत आहेत.
यावर्षी कापूस खरेदीबाबत, केंद्र सरकारचा राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड)शी करार न झाल्याने, कापूस खरेदी कोण करणार, या प्रतीक्षेत कापूस खरेदीला विलंब झाला. शेवटी राज्यात सीसीआयचा अभिकर्ता म्हणून पणन महांसघ हमी दराने कापूस खरेदी करेल असा निर्णय झाल्यानंतर, १५ नोव्हेंबर रोजी पणन महासंघाने राज्यात ३0 ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केली होती. कापसाची आवक वाढत गेल्याने खरेदी केंद्राची संख्या ७0 पर्यंंत वाढविण्यात येत आह; पण कापसाचे हमी दर प्रति क्विंटल ३९00 ते ३९५0 पर्यंंत असल्याने, शेतकर्यांची कोंडी होत आहे; परंतु आता व्यापार्यांनीही कापूस खरेदीस सुरुवात केल्याने, बाजारात स्पर्धा निर्माण होऊन, कापसाचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
-बाजारातील प्रति क्विंटल दर ३९७५
शासकीय खरेदीचे हमी दर ३९00 ते ३९५0 रू पये प्रति क्विंटल असून, खासगी बाजारात ३९७५ रू पये प्रति क्विंटल भाव आहेत. व्यापार्यांनी पूर्ण क्षमतेने कापूस खरेदी सुरू केल्यास, भाव चार हजाराच्या वर जाण्याची शक्यता, व्यापारी वतरुळात वर्तविण्यात येत आहे.