कापसाचे नवे ‘सुवर्ण शुभ्रा’ वाण विकसित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:34 PM2019-06-08T12:34:49+5:302019-06-08T12:34:56+5:30

अकोला : कोरडवाहू क्षेत्रात भरघोस उत्पादन देणारे ‘सुवर्ण शुभ्रा’(एकेएच-०९-५) कापसाचे सरळ वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले.

Cotton's new 'suvarna Shubra' varieties develop! | कापसाचे नवे ‘सुवर्ण शुभ्रा’ वाण विकसित!

कापसाचे नवे ‘सुवर्ण शुभ्रा’ वाण विकसित!

googlenewsNext

अकोला : कोरडवाहू क्षेत्रात भरघोस उत्पादन देणारे ‘सुवर्ण शुभ्रा’(एकेएच-०९-५) कापसाचे सरळ वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले. महाराष्टÑ राज्य कृषी विद्यापीठे कृषी संशोधन विकास समितीच्या सभेत नुकतीच या वाणाला मान्यता मिळाली आहे.
अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत देशी सरळ कापसाच्या आतापर्यंत दहा वाण (जाती) विकसित केल्या आहेत. शेतकऱ्यांनी सरळ वाण वापरू न जमीन, शेतीचे आरोग्य जपावे, असा यामागील उद्देश आहे. ब्राझील अतिघनता लागवड पद्धतीने कापूस उत्पादन घेण्याचे प्रयोग कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन विभागाच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आले. ही पद्धत वापरू न दुबार रब्बीचे पीकदेखील घेता येते. नवीन विकसित केलेली ‘सुवर्ण शुभ्रा’ हे कापसाचे वाणही कमी कालावधीत म्हणजे १५० ते १६० दिवसांत येणारे आहे. विशेष म्हणजे, तुडतुडे व पानावरील ठिपके रोगाला प्रतिकारक आहेत. बोंडाचे वजनही ४ ग्रॅम आहे. या कापसाच्या सुताची लांबी २८ ते ३० मि.मी. असून, जिनिंगची टक्केवारी ३५ ते ३६ टक्के आहे. इतर प्रचलित कापसाच्या वाणापेक्षा ‘सुवर्ण शुभ्रा’चे उत्पादन २० ते २५ टक्के जास्त आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी हे वाण उपयुक्त असल्याचा दावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केला आहे.
संशोधन आढावा सभेत मान्यता मिळाल्यानंतर यावर्षी ‘सुवर्ण शुभ्रा’चे कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक व बीजोत्पादन घेतले जाणार आहे.

- ‘सुवर्ण शुभ्रा’ हे नवीन कापसाचे वाण अथक परिश्रमाने विकसित करण्यात आले आहे. कोरडवाहू क्षेत्रात क ीड, रोगांना प्रतिकारक व प्रचलित वाणापेक्षा २० ते २५ टक्के अधिक उत्पादन देणाºया या कापसाचे बियाणे लवकरच शेतकऱ्यांना दिले जाईल.
डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

Web Title: Cotton's new 'suvarna Shubra' varieties develop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.