अकाेला : जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले विविध गुन्हे तसेच प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा तपास तातडीने करण्याचे निर्देश पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुरुवारी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीत दिले. यावेळी अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांनीही पाेलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर रुजू झाल्यानंतर दर महिन्याच्या शेवटी किंवा पहिल्या आठवड्यात पाेलीस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेत आहेत. गुरुवारी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील पाेलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याच्या सूचना केल्या. यासाेबतच अवैधधंद्यांवर कारवाईच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. चाेऱ्यांच्या वाढत्या घटनांवर तातडीने उपाययाेजना करून यावर नियंत्रण मिळविण्यात येणार असल्याचेही पाेलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. अट्टल चाेरट्यांचा शाेध घेऊन तसेच संशयितांवर आता कठाेर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी या बैठकीत पाेलीस अधिकाऱ्यांना सांगितले. या गुन्हे आढावा बैठकीत अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांनीही तपास तसेच विविध बाबींवर मार्गदर्शन केले. या बैठकीला स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, सिटी काेतवालीचे ठाणेदार यू. के. जाधव, खदानचे ठाणेदार डी. सी. खंडेराव, जुने शहरचे ठाणेदार महेश देशमुख, रामदास पेठचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, आकाेट फैलचे ठाणेदार महेंद्र कदम, डाबकीराेडचे विजय नाफडे, सिव्हिल लाइन्सचे भानुप्रताप मडावी यांच्यासह जिल्ह्यातील पाेलीस अधिकारी उपस्थित हाेते.