राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना लागू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:38 PM2019-06-02T13:38:07+5:302019-06-02T13:38:11+5:30
अकोला : राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे.
अकोला : राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या केंद्रावर विमा काढण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीच्या आत आॅनलाइन अर्ज भरता न आल्यास विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, असे शासनाने म्हटले आहे. याकरिता शेतकºयांनी पिकांच्या संरक्षणासाठी मुदतीपूर्वी नजीकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आवश्यक कागदपत्रांसहविमा काढणे अपरिहार्य आहे, तसेच कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी या कार्यालयासह बँक व आपले सरकार सेवा केंद्राशी शेतकºयांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.
दरम्यान, पीक काढण्यासाठी विमा कंपन्या निर्धारित करण्यात आल्या असून, उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, गडचिरोली, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, बीड रत्नागिरी, नंदूरबार, जळगाव, कोल्हापूर, लातूर तसेच अहमदनगर, परभणी, वाशिम, औरंगाबाद, बुलडाणा, अमरावती, धुळे, सोलापूर, सांगली, अकोला व यवतमाळ या ३० जिल्ह्यांसाठी अॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीत विमा काढल्या जाणार आहे. जालना, हिंगोली व नागपूर या तीन जिल्ह्यांचा पीक विमा बजाज अलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीकडे काढण्यात येणार आहे.