पीक कर्जाचे वाटप बारा टक्क्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:25 AM2020-05-24T10:25:33+5:302020-05-24T10:25:41+5:30

जिल्ह्यातील केवळ १६ हजार ६०६ (१२ टक्के) शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

Crop loan disbursement at 12%! | पीक कर्जाचे वाटप बारा टक्क्यावरच!

पीक कर्जाचे वाटप बारा टक्क्यावरच!

googlenewsNext

अकोला : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले असले तरी, पावसाळा तोंडावर आला असताना २२ मे पर्यंत जिल्ह्यातील केवळ १६ हजार ६०६ (१२ टक्के) शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
ह्यलॉकडाउनह्ण च्या पृष्ठभूमिवर कापसासह शेतमाल घरात पडून असल्याने जवळ पैसा नाही आणि कर्ज तातडीने उपलब्ध होत नसल्याच्या स्थितीत खरीप पेरणी आणि बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविणार कसा, याबाबतचे आव्हान संकटात सापडलेल्या शेतकºयांसमोर निर्माण झाले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आले असून, गत २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आल्याच्या पृष्ठभूमिवर दरवर्षी १ एप्रिलपासून सुरू होणारे पीक कर्जाचे वाटप यावर्षी २६ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत २२ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ १६ हजार ६०९ (१२ टक्के) शेतकºयांना १७० कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.
पावसाळा सुरू होण्यास केवळ आठ दिवसांचा कालावधी उरला असताना, उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ १२ टक्के शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, उर्वरित ८८ टक्के शेतकºयांना अध्याप पीक कर्जाचे वाटप होणे बाकी आहे. कापूस खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करूनही जिल्ह्यातील अनेक शेतकºयांच्या घरात कापूस पडून आहे. लॉकडाउनच्या पृष्ठभूमिवर कापसासह इतर शेतमाल घरात पडून असल्याने जवळ पैसा नाही आणि पीक कर्ज तातडीने मिळत नसल्याच्या परिस्थितीत खरीप पिकांच्या पेरणीचा खर्च आणि बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविणार कसा, याबाबत चिंता आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना सतावत आहे.

बँकनिहाय असे आहे -पीक कर्ज वाटपाचे वास्तव!
बँक शेतकरी रक्कम(कोटी) जिल्हा सहकारी बँक ११८४६ १२५.१७ ग्रामीण बँक १९८० १८.६४ राष्ट्रीयीकृत बँका २७८३ २६.८८


जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी २२ मेपर्यंत १६ हजार ६०९ शेतकºयांना १७० कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

-आलोक तारेनिया व्यवस्थापक , जिल्हा अग्रणी बँक.

Web Title: Crop loan disbursement at 12%!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.