शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

अतिक्रमीत रस्ते लोकसहभागातून होणार मोकळे!

By admin | Published: August 05, 2016 12:42 AM

महाराजस्व अभियानांतर्गत राज्यभरात राबवली जाणार विशेष मोहीम.

वाशिम, दि. ४ - गाव नकाशात दर्शविल्याप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले पाणंद रस्ते, शिवाररस्ते, शेतांमध्ये जाण्यासाठी तयार केलेली पाउलवाट लोकसहभागातून मोकळी केली जाणार आहे. यासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी गुरूवारी दिली.१ ऑगस्ट २0१६ ते ३१ जुलै २0१७ या वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण राज्यात महाराजस्व अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत सर्वसामान्य जनता व शेतकर्‍यांचे महसूल विभागासंदर्भातील प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यानुसार, ग्रामीण भागातील शेतशिवारांमध्ये जाणारे पाणंद रस्ते, शिवाररस्ते, पाउलवाट आदींबाबतची माहिती संबंधित तलाठय़ांकडून संकलित करून दर्शनी भागात प्रकाशित केली जाणार आहे. जे शेतकरी अतिक्रमीत व बंद झालेले रस्ते मोकळे करून देण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतील, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही; पण ज्यांनी या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. महाराजस्व अभियानांतर्गत मोकळे केले जाणारे ६ फूट किंवा त्यापेक्षा अधिक रुंदीचे रस्ते महात्मा गांधी रोजगार हमी योजना किंवा जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून विकसीत करावे, असे शासनाचे निर्देश आहेत. "वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात यापूर्वी देखील अतिक्रमीत व विविध कारणांनी बंद झालेले शेतरस्ते, पाउलवाट मोकळी करण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यास बर्‍यापैकी यश मिळाले. महाराजस्व अभियानांतर्गत ही मोहीम अधिक गतीमान केली जाईल." राजेंद्र देशमुखनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम