बँकांमध्ये गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 05:31 PM2021-04-05T17:31:43+5:302021-04-05T17:32:11+5:30
No physical distance in Banks: नियम कोणी पाळत नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मूर्तिजापूर : सततच्या सुट्ट्यांनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी बॅंकेत मोठी गर्दी केली. काही बॅंके बाहेर पण रांगा दिसून आल्या अशावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा पार बोजवारा उडाला आहे. घालून दिलेले नियम कोणी पाळत नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सतत आलेल्या सुट्ट्यांनंतर ५ एप्रिल सोमवारी सकाळी बॅंकेच्या वेळेपासूनच नागरिकांनी बॅंकेतील व्यवहारासाठी अनेक बॅंकासमोर व बॅंकेत एकच गर्दी, परीणामी बॅंके बाहेर ग्राहकांच्या रांगा पहायला मिळाल्या, बॅकेत गर्दी होत असताना किंवा बाहेर सांगा लावलेल्या असताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचा पार बोजवारा उडाला आहे. रांगेत लोक एकमेकांजवळ उभे राहून पुढे सरकत होतो तर काहींनी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधलेला नसल्याने शहरात कोरोना विषाणूचा फैलाव झपाटय़ाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक बॅंके बाहेर सुरक्षा रक्षक नसल्याने हा प्रकार घडत असल्याचे आहे. सततच्या सुट्ट्या, कर्मचारी पेन्शन व निराधार गरजूंच्या खात्यात पैसे जमा झाल्यानेच नागरीकांनी बँकेत एकच गर्दी केली असल्याचे बँक अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
नागरिकांना कोरोना महामारी संदर्भात जराही भय नसल्याने येथील नागरीक स्थानिक प्रशासने वारंवार सुचना देऊनही रस्त्यावर बिनदिक्कत पणे फिरताना दिसतात. येवढेच नव्हे तर किराणा, औषधी, भाजीपाला दुकानासह बॅंकेत ठरवून दिलेल्या कुठल्याही नियमाचे पालन होत नसल्यानेचे आढळून आले. नको त्याठिकाणीही गर्दी होत आहे. एक मिटर फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम घालून दिला असताना देखील मर्यादेचे कोणीही पालन करीत नाहीत. वास्तविक त्या त्या दुकानदाराने जबाबदारीने वागून त्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करुन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास ग्राहकांना भाग पाडणे गयजेचे आहे. पण तसे होताना कुठेच दिसत नाही. पर्यायाने बेफिकीर असलेले नागरीकच कोरोना वाहक बनत आहेत.