अकोला : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास ( दलित वस्ती ) योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचा नवीन बृहद आराखडा तयार करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीत करावयाच्या नवीन कामांचा बृहद आराखडा तयार करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. नवीन कामांचा बृहद आराखडा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या मुद्द्यावरही या सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेत समिती सदस्य आम्रपाली खंडारे, माया नाइक, प्रशांत अढाऊ, वंदना झळके यांच्यासह जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
...........................फोटो...............................................