सद्य:स्थितीत परिसरात भुईमूग पिकाची काढणीचे काम अंतिम टप्प्यात असून, शेतकरी कामात व्यस्त आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची भुईमूग काढणीची लगबग सुरू आहे. रविवारी अचानक आलेल्या पावसामुळे भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने भुईमूग पिकावर शेतकऱ्यांची आशा होती. मात्र, रविवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे पेरणीसाठी पैसे कुठून गोळा करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. परिसरातील भुईमूग, टरबूज, कांदा, आंबा, पपई पिकांची नासाडी झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
सौंदळा परिसरात भुईमूग पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:17 AM