तेल्हारा - तालुक्यातील गोर्धा येथील इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी साक्षी बाळकृष्ण थोरात या मुलीचा चूल पेटविताना जळून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.हिवरखेड पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गोर्धा येथील बाळकृष्ण थोरात यांची मुलगी साक्षी ही २१ फेब्रुवारीला आईवडील शेतात शेतमजुरी करण्याकरिता गेले असता सकाळी ९ वाजता साक्षीने आंघोळीकरिता चूल पेटवण्याकरिता रॉकेल टाकले व चूल पेटवली व फडका झाल्याने तिच्या कपड्याने पेट घेतल्याने साक्षीने आरडा ओरड केल्याने तिचे कामा सुरेश थोरात धवतच घरात आले. त्यांना साक्षी आगीने लपेटलेली दिसली. त्यांनी त्वरित चादर घेऊन तिच्या अंगावर टाकले व त्वरित तिला तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तापडीया यांनी त्वरित पुढील उपचारासाठी अकोला सामान्य रुग्णालयात पाठविले. तेथे उपचारादरम्यान २२ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. तेथेच पोस्टमार्टम करून प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
चूल पेटविताना जळून चिमुकलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 11:09 PM