रोहनखेड (अकोला) : रानडुकरांनी केलेल्या हल्यात शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना ४ मार्च रोजी रोहनखेड शिवारात उघडकीस आली. पंजाब देवमन वानखडे (६०)असे मृतकाचे नाव आहे.रोहनखेड येथील पंजाब वानखडे हे ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता बकऱ्या घेउन शेतात गेले होते. संध्याकाळ झाल्यानंतरही ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाही. ४ मार्च रोजी रोहनखेड शिवारात निळकंठ झामरे यांच्या शेताला लागून असलेल्या तलावाजवळच्या पाटात पंजाब वानखडे यांचा मृतदेह काही ग्रामस्थांना आढळला. याविषयी माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. याविषयी दहीहांडा पोलिस आणि वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळावर उपनिरीक्षक शांतीलाल भिलावेकर, कुटासा बिटचे पोकॉ श्याम बुंदेले, वाघ, सरपंच अनिता चव्हाण, माजी सरपंच रंजीत झामरे, वन परिक्षेत्र अधिकारी व्ही.एल.लाड, अकोट वनक्षेत्र सहायक बावणे, बिट वनरक्षक डी.ए.सुरजसे, वनमजुर मेसरे, डोंगरे आदींनी भेट देउन पंचनामा केला.यावेळी पंजाब वानखडे यांच्या शरीरावरील जखमावरून त्यांच्यावर रानडुकरांनी हल्ला केल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.तसा उल्लेख वन विभागाने आपल्या पंचनाम्यात नमुद केले आहे. पंजाब वानखडे यांच्या मागे मुलगा, मुली, नातवंड व आप्त परिवार आहे. (वार्ताहर)रानडुकरांचा मुक्त संचाररोहनखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांना मुक्त संचार सुरू आहे. रानडुकरांनी अनेक शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. तसेच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू झाल्याने शेतकºयांसह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, या रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 5:37 PM