जखमी अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 09:37 PM2021-02-13T21:37:14+5:302021-02-13T21:37:31+5:30

Crime News पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

Death of a youth who was found injured | जखमी अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचा मृत्यू

जखमी अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचा मृत्यू

googlenewsNext

मूर्तिजापूर :  येथील नगरपरिषद परीसरात एक २८ वर्षीय युवक शुक्रवारी रात्री उशीरा खमी अवस्थेत आढळून आला होता.  येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू मागे घातपात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
           तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम ताकवाडा येथील युवक चक्रधर विष्णुदास मेतकर (२८) राहणार ताकवाडा हा बाजारासाठी मूर्तिजापूर येथे आला होता.  परंतु तो रात्री गावी पोहोचलाच नाही. रात्री २ वाजता गस्तीवर असलेल्या शहर पोलीसांना तो येथील नगरपरिषद आवारात जखमी अवस्थेत आढळून आला.  पोलीसांनी तात्काळ येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाला बोलावून पथकाच्या सदस्यांनी चक्रधर मेतकर याला गंभीर अवस्थेत येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.  परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. परंतु अकोला येथे ही प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून डॉक्टरांनी नागपूर येथे नेण्याचा सल्ला दिला.  नागपूर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आपण रात्री घरी परत जात असताना मूर्तिजापूर पासून ६ किलोमीटर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील खरब खरबडी या गावाजवळ दुचाकीवरुन पडलो व त्यात जखमी झालो. तेथून जखमी अवस्थेत पायी मूर्तिजापूर येथे असे मृत्यूपूर्व बयान नोंदविले असले तरी ताकवाडा हे गाव हिरपूर रस्त्यावर खापरवाड़ा गावाजवळ आहे.  राष्ट्रीय महामार्गावर वरुन जाण्याची गरज काय, तो पडल्यावर चालत मूर्तिजापूर न येता बाजूला  असलेल्या खरब खरबडी गावात का गेला नाही, दुचाकीवरुन पडल्याने त्याच्या हाताचा पुर्णतः चुराडा कसा झाला, मूर्तिजापूरात पायी आला असताना थेट रुग्णालयात का गेला नाही,  हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. या संदर्भात शहर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: Death of a youth who was found injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.