लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या अकोला व वाशिम जिल्हय़ातील शेतकर्यांपैकी १६ हजार शेतकर्यांच्या कर्जखात्यात ९0 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम मंगळवारी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत जमा करण्यात आली. त्यामुळे कर्जमाफी योजनेंतर्गत दोन्ही जिल्हय़ात १६ हजार शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बँकांना प्राप्त झाल्यानंतर संबंधित शे तकर्यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा करून कर्जमाफी देण्यात येत आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ात दोन लाख थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी ६२ हजार शेतकर्यांच्या ग्रीन याद्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या असून, ६२ हजार शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासाठी १२८ कोटींची रक्कमदेखील प्राप्त झाली आहे. त्यानुषंगाने याद्यांची पडताळणी करून शेतकर्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ातील १६ हजार शेतकर्यांच्या कर्जखात्यात ९0 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मंगळवारी जमा करण्यात आली. कर्जखात्यात रक्कम जमा करण्यात आल्याने दोन्ही जिल्हय़ा तील १६ हजार शेतकर्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
४६ हजार शेतकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्यांची पडताळणी सुरू!कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकर्यांपैकी अकोला व वाशिम जिल्हय़ातील ६२ हजार शेतकर्यांच्या ग्रीन याद्या प्राप्त झाल्या. त्यापैकी पडताळणी पूर्ण झालेल्या १६ हजार शेतकर्यांना मंगळवारी कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ४६ हजार शे तकर्यांच्या ‘ग्रीन’ याद्यांची पडताळणी करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुरू आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शे तकर्यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.