लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यातील शिक्षकांनी अशैक्षणिक कामे करू नयेत असा शासन आदेश असतानाही निवडणूक निर्णय अधिकारी बीएलओचे काम नाकारणार्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करीत आहेत. हा शिक्षकांवर अन्याय असल्याने, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ना. तावडे यांनी शिक्षकांवर अन्याय होवू देणार नाही. अधिवेशन आटोपल्यानंतर मुंबई येथे बीएलओ कामाबाबत निर्णय घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीएलओ काम नाकारल्या मुळे राज्यभरातील काही जिल्हय़ांमध्ये निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांच्या सुचनेवरून शिक्षकांवर गुन्हे दाखल केले. शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे देऊ नये. असा शासन निर्णय आहे. त्यानंतरही शिक्षकांकडे अनेक अशैक्षणिक लादली जातात. शासनाने शिक्षकांवरील हा अन्याय दूर करावा. अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत या जिल्ह्यातील शिक्षकांवर बीएलओचे काम नाकारल्यामुळे गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावरील गुन्हे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मागे घेण्यात येतील. त्या जिल्ह्यातील संबधित शिक्षक आणि सर्व शिक्षकसंघटनाच्या पदाधिकार्यांची एकत्रित सभा घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे दिले. नागपूर येथील बैठकीला शिक्षक परिषदेचे प्रांतअध्यक्ष वेणूनाथ कडू आमदार संजफ केळकर, पदवीधर आमदार अनिल सोले, शिक्षक आमदार नागो गाणार, माजी शिक्षक आमदार भगवानअप्पा साळुंखे, राज्यअध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्याध्यक्ष सुनील पाटील, राज्य उपाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्याध्यक्ष श्याम कुलट आदी उपस्थित होते.
बीएलओचे काम नाकारणार्या शिक्षकांबाबत लवकरच निर्णय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:20 PM
यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ना. तावडे यांनी शिक्षकांवर अन्याय होवू देणार नाही. अधिवेशन आटोपल्यानंतर मुंबई येथे बीएलओ कामाबाबत निर्णय घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्देशिक्षक परिषदेचा पाठपुरावाशासन निर्णय असल्यानंतरही शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादणे अन्यायकारक