या वेळी महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, चाइल्ड लाइन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. सुनील मानकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती ताटे, डॉ. वंदना पटोकार, सुनील सरकटे आदी उपस्थित होते. सध्या जिल्ह्यात ५० वर्षाच्या वयोगटातील पालकांच्या सर्वेक्षणाद्वारे एकल पालक असलेल्या १२३ बालकांची माहिती बाल कल्याण समितीकडे देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.
कोविड महामारीमुळे पालक गमावलेल्या बालकांचा बाल संगोपन योजनेत समावेश करून त्यांचे पालन पोषण व सरंक्षण करा. तसेच दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या कुटुंबाचे प्रस्ताव तयार करून तेही शासनाकडे मार्गदर्शनाकरिता पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
जिल्ह्यात १० हजारांवर घरांचे नुकसान; पंचनाम्याबद्दल आक्षेप नोंदवा!
अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टीत झालेल्या घरांच्या नुकसानीबाबत ४२६ बाधित गावांपैकी २९९ गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यात नुकसान झालेल्या घरांची संख्या १० हजार २३६ आहे. त्यात अंशत: नुकसान ९९६५ तर पूर्णत: नुकसान झालेल्या घरांची संख्या २७१ आहे. दरम्यान, झालेल्या पंचनाम्यांबद्दल कुणास आक्षेप असल्यास त्यांनी तो संबंधित तहसीलदार कार्यालयात २९ जुलैपर्यंत नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
अकोला तालुका बाधित गावे १८३, पंचनामा झालेली गावे १६०, नुकसान झालेल्या घरांची संख्या ८६२० (अंशत: ८४००, पूर्णत: २२०), क्षतिग्रस्त दुकाने २३४. बार्शिटाकळी तालुका बाधित गावे १४०, पंचनामा झालेली गावे ३५, नुकसान झालेल्या घरांची संख्या १९७ (अंशत: १९७, पूर्णत: शून्य). अकोट तालुका बाधित गावे ३१, पंचनामा झालेली गावे ३१, नुकसान झालेल्या घरांची संख्या १९६ (अंशत: १९६, पूर्णत: शून्य). तेल्हारा तालुका बाधित गावे १२, पंचनामा झालेली गावे १२, नुकसान झालेल्या घरांची संख्या १९ (अंशत: १८, पूर्णत: एक), बाळापूर तालुका बाधित गावे ५५, पंचनामा झालेली गावे ५५, नुकसान झालेल्या घरांची संख्या ११८८ (अंशत: ११३८, पूर्णत: ५०), पातूर तालुक्यात नुकसान नाही. मूर्तिजापूर तालुका बाधित गावे सहा, पंचनामा झालेली गावे सहा, नुकसान झालेल्या घरांची संख्या १६ आहे.