अकोला: सातवा वेतन आयोग लागू होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला; परंतु अद्याप राज्यातील जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला नाही. त्यामुळे नाराज कर्मचाºयांनी आंदोलनाचा इशारा दिला.शासकीय कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगासोबतच सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे व पाच दिवसांचा आठवडा करणे या प्रमुख मागण्या आहेत. जिल्हा परिषद कर्मचाºयांचा ‘ग्रेड पे’ वाढविणे, परिचर संवर्गाच्या मागण्या, आरोग्य व लेखा कर्मचाºयांच्या मागण्यासुद्धा अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यातच सातारा येथे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष बलराज मगर, कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड, सचिव विवेक लिंगराज, यांच्यासह ३० जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे २७५ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली असून, सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जिल्हा परिषद कर्मचाºयांनी दिला. सभेत अकोला जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विकास वरोकार, राज्य सरचिटणीस सुनील जानोरकर, कार्याध्यक्ष राम मेहरे, सचिव गिरीश मोगरे, उपाध्यक्ष विनोद गजताप व सदस्य संजय पल्हाडे यांची उपस्थिती होती.