अकोला : महाराष्टÑ राज्य (महाबीज) बियाणे महामंडळ निर्मित बीजी-२ कापूस बियाण्यांची मागणी वाढली आहे. विक्रेत्यांनी जवळपास एक लाख पाकीटांची मागणी नोंदविली; परंतु महाबीजकडे एवढा साठाच उपलब्ध नसल्याने यावर्षी तरी शेतकऱ्यांची ही गरज पूर्ण होणार नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, राज्यासाठी ७ लाख ६ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.महाबीजने पीकेव्ही हायब्रीड-२ व नांदेड-४४ कापसाच्या या जातीमध्ये बीटी जीन्स टाकून बीजी-२ कपाशीची नवी जात विकसित केली. मागील दोन वर्षे प्रात्यक्षिक घेतल्यानंतर मागच्या वर्षी गुजरातसह राज्यात बीजोत्पादन घेण्यात आले. पहिल्याच वर्षी नवीन बीटी कॉटनची मागणी वाढली असून, विक्रेत्यांनी जवळपास एक लाख पॅकेटची मागणी महाबीजकडे नोंदविली. तथापि यावर्षी महाबीजकडे ४२ हजार ५०० पॅकेटच उपलब्ध आहेत.दरम्यान, यावर्षीच्या खरीप हंगामासाठी महाबीजने ७ लाख ६ हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले असून, उडीद १३,८०० क्ंिवटल, तूर १० हजार तर मुगाचे ४,५०० क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन केले. हे सर्व बियाणे बाजारात उपलब्ध करण्यात आले.- अनुदानित बियाण्यांना होणार विलंब!शासन अनुदानावर बियाणे उपलब्ध करीत असते. त्यासाठी महाबीज शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करते. यावर्षी यावर अद्याप निर्णय झाला नसल्याने अनुदानित बियाणे उपलब्ध होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
पहिल्याच वर्षी बीटी कॉटची ८० ते ९० हजार पॅकेटची मागणी विक्रेत्यांनी नोंदविली आहे. यावर्षी ४२,५०० क्ंिवटल बियाणे उपलब्ध केले. पुढच्या वर्षी मागणीनुसार मुबलक बियाणे उपलब्ध केले जातील.- प्रकाश ताटर,प्रभारी महाव्यस्थापक (विपणन),महाबीज, अकोला.