ऑक्सिमीटरची मागणी वाढली; सॅनिटायझरची घटली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:58 AM2020-09-10T11:58:28+5:302020-09-10T11:58:37+5:30

रीराचे तापमान आणि आॅक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स आॅक्सिमीटरची मागणी वाढली आहे.

Demand for oximeters increased; Sanitizer dropped! | ऑक्सिमीटरची मागणी वाढली; सॅनिटायझरची घटली !

ऑक्सिमीटरची मागणी वाढली; सॅनिटायझरची घटली !

Next

अकोल : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे धास्तावलेल्या अकोलेकरांनी काळजीपोटी आॅक्सिमीटर घेण्याकडे कल वाढविला आहे. त्यामुळे बाजारात आॅक्सिमीटरची मागणी वाढली आहे दुसरीकडे सॅनिटायझरची मागणी आश्चर्यकारकरीत्या कमी झाल्याचे चित्र दवा बाजारात आहे.
अकोल्यात सौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या शरीराचे तापमान आणि आॅक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स आॅक्सिमीटरची मागणी वाढली आहे.
कोरोनापूर्वी केवळ रुग्णालयांकडूनच खरेदी केले जाणारे आॅक्सिमीटर आता तुलनात्मकरीत्या पूर्वीपेक्षा जास्त विकले जात आहेत. लोकांमध्ये आरोग्याप्रति जागरूकता वाढल्याने या उपकरणांची विक्री वाढल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.
कोरोना रुग्णाव्यतिरिक्त कोरोना नसलेले लोकही घरी तापमान आणि आॅक्सिजन स्तर मोजण्यासाठी या दोन्ही उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात थर्मल स्कॅनर व मास्कची मागणी वाढली होती. आता ही मागणी आश्चर्यकारक घटली आहे.
ही दोन्ही उपकरणे फार्मासह नॉन फार्मा दुकानांमध्येही विक्रीस आहेत. विशेष म्हणजे उपलब्धता वाढल्याने या उपकरणांच्या किमती कमी झाल्या आहेत. पूर्वी ही उपकरणे चीनमधून आयात व्हायची; पण आता भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे.


मास्कचीही मागणी घटली
मार्च ते मे या तीन महिन्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात होती. एन-९५, ट्रिपल लेअर यासोबतच कापडी मास्कचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. आता मात्र मास्कची मागणी घटली आहे. अनेक नागरिकांचा घरगुती मास्कचा वापर करण्याकडे कल वाढला असल्यानेही या मागणीत घट आली आहे.

 
आॅक्सिजन स्तर मोजण्यासाठी पल्स आॅक्सिमीटरची खरेदी पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे, तसेच या उपकरणांचा पुरवठाही वाढला असल्याने कुठेही तुटवडा नाही.
- प्रकाश सावंल, औषध विक्रेते.

 
किमतीही घटल्या

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आॅक्सिमीटरची किंमत ही जास्त होती. त्यावेळी वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होता. परिणामी, या उपकरणाची ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत विक्री झाली होती; पण आता हेच उपकरण विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादीत केले आहे, त्यामुळे ५०० रुपयांपासून सहज उपलब्ध होत आहे.

 

Web Title: Demand for oximeters increased; Sanitizer dropped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.