संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 02:43 PM2018-06-19T14:43:03+5:302018-06-19T14:56:42+5:30
श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी ब्रम्ह मुहूर्तावर पंढरपूरकडे रवाना झाली.
शेगाव : श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी ब्रम्ह मुहूर्तावर पंढरपूरकडे रवाना झाली. संतनगरीतील भाविकांसह परिसरातील हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी यावर्षी 600 हून अधिक वारक-यांसह, रथ, मेणा, गज, अश्वासह, टाळकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेत. सकाळी 7 वाजता संत गजानन महाराज मंदीरातून पालखी मार्गस्थ झाली. तत्पूर्वी संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्यांचे पूजन करण्यात आले. उपस्थित विश्वस्त आणि भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपुरपर्यंत तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० कि.मी.चे अंतर कापुन श्रींची पालखी २१ जुलै शनिवारला पंढरीच्या पावन भूमीवर पोहोचेल. १९ जून रोजी श्री क्षेत्र नागझरी, रात्री मुक्काम पारस, २० जून रोजी गायगाव, रात्री मुक्काम भौरद, २१ व २२ जून अकोला, २३ जून रात्री मुक्काम वाडेगाव, २४ जून देऊळगाव, रात्री मुक्काम पातुर, २५ जून मेडशी, रात्री मुक्काम श्री क्षेत्र डव्हा, २६ जून मालेगाव, रात्री मुक्काम शिरपुर जैन, २७ जूनला चिंचाबापेन रात्री मुक्काम म्हसला पेन, २८ जून किनखेडा रात्री रिसोड येथे मुक्काम, २९ जून पानकन्हेरगाव रात्री मुक्काम सेनगाव, ३० जून श्री क्षेत्र नरसी (नामदेव) रात्री डिग्रस येथे मुक्काम, १ जुलै श्री क्षेत्र औंढा नागनाथ व रात्री मुक्काम जवळा बाजार, २ जुलै अडगाव रजोबा-हट्टा रात्री मुक्काम श्री क्षेत्र त्रिधारा, ३ जुलै रोजी परभणी, ४ जुलै ब्राम्हणगाव रात्री मुक्काम दैठणा, ५ जुलै खळी रात्री मुक्काम गंगाखेड येथे, ६ जुलै वडगाव (दादाहरी), रात्री मुक्काम परळी, ७ जुलै परळी रात्री मुक्काम वैजनाथ येथे., ८ जुलै कन्हेरवाडी रात्री मुक्काम अंबेजोगाई , ९ जुलै लोखंडी सावरगाव रात्री मुक्काम बोरी सावरगाव, १० जुलै गोटेगाव रात्री मुक्काम कळंब, ११ जुलै गोविंदपुर रात्री मुक्काम तेरणा साखर कारखाना, १२ जुलै किनी, रात्री मुक्काम उपळा, १३ जुलै संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर (उस्मानाबाद), १४ जुलै वडगाव सिद्धेश्वर, रात्री मुक्काम श्री क्षेत्र तुळजापुर, १५ जुलै सांगवी, रात्री मुक्काम उळे, १६ जुलै सोलापुर, १७ जुलै सोलापुर, १८ जुलै रोजी सोलापुर रात्री मुक्काम तिरट्टे, १९ जुलै कामती खु. (वाघोती), रात्री मुक्काम माचनुर, २० जुलै ब्रम्हपुरी, रात्री मुक्काम श्री क्षेत्र मंगळवेढा व २१ जुलै रोजी श्री क्षेत्र मंगळवेढा असा प्रवास करत रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचेल. पालखी अकोलाकडे मार्गस्थ होताना, भाविक तसेच वारकºयांनी शेगावच्या सीमेपर्यंत सोबत केली.