जलवाहिनीच्या खाेदकामात माती रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:19 AM2021-05-09T04:19:22+5:302021-05-09T04:19:22+5:30

जलवाहिनीवर अवैध नळ जोडणी अकोला : शहराच्या विविध भागात अवैधरीत्या नळ जोडणी घेण्यात आली आहे. पाेळा चाैकात मनपाच्या मुख्य ...

On the dirt road in the aqueduct excavation | जलवाहिनीच्या खाेदकामात माती रस्त्यावर

जलवाहिनीच्या खाेदकामात माती रस्त्यावर

googlenewsNext

जलवाहिनीवर अवैध नळ जोडणी

अकोला : शहराच्या विविध भागात अवैधरीत्या नळ जोडणी घेण्यात आली आहे. पाेळा चाैकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या नळ जाेडणी घेऊन त्यामाध्यमातून दिवसभर पाण्याचा बेसुमार वापर केला जात आहे. हा प्रकार मनपा जलप्रदाय विभागाच्या निदर्शनास येत असतानाही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.

रस्त्यावर बांधकाम साहित्य

अकोला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या गजानननगर परिसरात रस्त्यावर बांधकाम साहित्य पडून आहे. यामध्ये रेती, विटा, गिट्टीचा समावेश असून अनेक दुचाकी वाहनधारक, सायकलस्वार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर साहित्य मनपाने त्वरित जप्त करण्याची गरज असताना मनपाकडून दुर्लक्ष केले जात आहे़

अनावश्यक बॅरिकेड हटवा!

अकोला : काेराेनाच्या सबबीखाली पाेलीस प्रशासनाने शहरातील प्रमुख चाैकांमध्ये बॅरिकेड उभारले़ यामध्ये जय हिंद चाैक, गांधी रोडवर मुख्य चौकात तसेच खदान पाेलीस ठाणे नजीक बॅरिकेड लावले आहेत. या बॅरिकेडमुळे चारचाकी वाहनचालकांना अडथळा निर्माण हाेत आहे. ही बाब पाहता पाेलिसांनी अनावश्यक बॅरिकेड हटविण्याची मागणी हाेत आहे.

रेल्वेस्टेशन चाैकात अस्वच्छता

अकोला : शहरातील रेल्वेस्टेशन चाैकात साफसफाईअभावी प्रचंड घाण व कचरा साचल्याचे दिसून येते. या चौकात मातीचे ढीग व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत आहे.

खड्डा ठरतोय जीवघेणा

अकोला : श्रीवास्तव चाैकातील कामगार कल्याण मंडळासमाेर जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने भलामोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. हा खड्डा जीवघेणा ठरण्याची चिन्हं पाहता तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.

‘दररोज पाणीपुरवठा करावा’

अकोला :‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे; परंतु दैनंदिन पाणीपुरवठा हाेत नसल्याने अकाेलेकरांमध्ये नाराजी आहे. मनपाने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रभाग १मधील नायगाव येथील रहिवाशांनी केली आहे.

Web Title: On the dirt road in the aqueduct excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.