आदिवासी गावात ब्लँकेटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:38+5:302020-12-23T04:15:38+5:30

अकोटः सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी गावात मोठ्या प्रमाणात ब्लँकेट, कपडे व पादत्राणे वाटप करण्यात आले. जंगलात थंडीत कुडकुडत आदिवासी ...

Distribution of blankets in tribal villages | आदिवासी गावात ब्लँकेटचे वाटप

आदिवासी गावात ब्लँकेटचे वाटप

Next

अकोटः सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी गावात मोठ्या प्रमाणात ब्लँकेट, कपडे व पादत्राणे वाटप करण्यात आले.

जंगलात थंडीत कुडकुडत आदिवासी गावकरी राहतात. अशा लोकांना ऊब देण्याचे प्रेरणादायी कार्य भैय्यूजी महाराज यांच्या प्रेरणेने करण्यात आले . मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा वनपरिक्षेत्रातील बोरीखेडा, गडगाभांडुम व दाभिया या क्षेत्रात अनेक कुटुंब आजही राहतात. त्यांना अनेक समस्या सामना करावा लागतो. हिवाळ्यात थंडीने व्याकूळ झालेल्या गरीब व गरजू अशा ५०० लोकांना ब्लँकेट देण्यात आले. शिवाय लहान मुलांना चपलाचे १०० जोड, ६० साडी, कपडे २०० व खाद्यपदार्थ वितरण केले. या प्रसंगी पंडित शेखर शर्मा, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, लता शर्मा, भाग्यश्री शर्मा, कोमल शर्मा, रितेश शर्मा, तृप्ती शर्मा, साक्षी शर्मा, नारायनी चौधरी, शंकर भगत, सचिन तळोकार, संदीप ताडे, अनिल मालवे उपस्थित हाेते.

Web Title: Distribution of blankets in tribal villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.