पॉझिटिव्ह रुग्णांना किटचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:20 AM2021-05-26T04:20:04+5:302021-05-26T04:20:04+5:30

नैसर्गिक आपत्तीसाठी टाेल फ्रि क्रमांक अकाेला: अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती व्‍यवस्‍थापन कक्ष कार्यान्‍वित करण्‍यात आला आहे. नैसर्गिक संकट ओढवल्यास ...

Distribution of kits to positive patients | पॉझिटिव्ह रुग्णांना किटचे वितरण

पॉझिटिव्ह रुग्णांना किटचे वितरण

Next

नैसर्गिक आपत्तीसाठी टाेल फ्रि क्रमांक

अकाेला: अग्निशमन विभागात नैसर्गिक आपत्ती

व्‍यवस्‍थापन कक्ष कार्यान्‍वित करण्‍यात आला आहे. नैसर्गिक संकट ओढवल्यास नागरिकांच्या सुविधेसाठी कक्षाचे गठन करण्यात आले असून, हा कक्ष २४ तास सुरू राहणार आहे़ मनपाकडून नैसर्गिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्ष येथील दुरध्‍वनी क्रमांक

०७२४-२४३४४६० आणि टोल फ्री क्रमांक १८००२३३५७३३ जारी करण्यात आला आहे.

७९१ जणांनी केली चाचणी

अकाेला: काेराेना विषाणूचा संपूर्ण शहरात प्रादूर्भाव झाला आहे़ विविध भागात काेराेना बाधित रुग्ण आढळून येत आहेत़ दरम्यान, काेराना सदृश लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे ७९१ जणांनी मनपाच्या विविध चाचणी केंद्रांमध्ये नाकातील स्त्रावाचे नमुने दिले़ यामध्ये २५९ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली़ तसेच ५३२ रॅपिड ॲन्टिजन चाचणी केली़

शहरात ९६ जण काेराेना बाधित

अकाेला: महापालिका क्षेत्रातील ९६ रहिवासी नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झाला आहे़ यामध्ये पूर्व झाेनमध्ये ३२,पश्चिम झाेनमध्ये १९,उत्तर झाेन १२ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे ३६ रुग्ण आढळून आले आहेत़ मागील तीन दिवसांपासून शहरात काेराेना बाधितांच्या संख्येत घसरण आल्याचे दिसत आहे़ हा अकाेलेकरांसाठी दिलासा मानला जात आहे़

बाजारात साहित्य खरेदीसाठी झुंबड

अकाेला: काेराेना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ यादरम्यान, सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली करण्याला परवानगी आहे़ या चार तासांच्या कालावधीत साहित्य खरेदीसाठी नागरिक झुंबड करीत असल्याचे चित्र आहे़ यावेळी साेशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविल्या जात असल्याचे दिसून येत आहे़

लसीकरणासाठी नाेंदणी करा!

अकाेला: काेराेना विषाणूला अटकाव घालण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे़ यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डाेस घेण्यासाठी ऑनलाइन नाेंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे़ ऑनलाइन नाेंदणी केल्यास लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी हाेणार नाही़ दरम्यान, लसीकरणाच्या वेळापत्रकात दरराेज बदल केला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण हाेत आहे़ याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़

जठारपेठ चाैकात दुकाने खुली

अकाेला: जीवनावश्यक वस्तूंची खरेदी व विक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे़ सकाळी अकरा नंतरही काही व्यावसायिक त्यांची दुकाने खुली ठेवत असल्याचे जठारपेठ चाैकात दिसून येत आहे़ रस्त्यालगत भाजीपाला व फळ विक्रेत्यांची गर्दी असून, याकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे़

नेकलेस राेड अंधारात

अकाेला: शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या नेहरु पार्क चाैक ते दुर्गा चौकपर्यंतच्या नेकलेस राेडवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे़ या मुख्य रस्त्याचे निर्माण झाल्यानंतर एलइडी पथदिवे उभारणे क्रमप्राप्त हाेते़ मागील चार वर्षांपासून या रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे सायंकाळ हाेताच रस्त्यावर अंधार निर्माण हाेताे़ यामुळे वाहनचालक वैतागले आहेत़

Web Title: Distribution of kits to positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.