दानापूर येथे दिव्यांगांचा लसीकरणाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:34+5:302021-05-23T04:17:34+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ...

Divyang responds to vaccination at Danapur | दानापूर येथे दिव्यांगांचा लसीकरणाला प्रतिसाद

दानापूर येथे दिव्यांगांचा लसीकरणाला प्रतिसाद

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदीसह लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दानापूर येथील ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशावरून ४५ वर्षांवरील दिव्यांगांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरपंच सपना घम्मपाल वाकोडे, ग्रामसेवक एस. बी. काकड, गोपाल विखे यांनी पुढाकार घेऊन गावातील ४५ वर्षांवरील वयोगटातील दिव्यांगांचे लसीकरण केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी अनिल झांबरकर, प्राथमिक आरोग्य कर्मचारी आशिष गौर, आशा सेविका आदी उपस्थित होत्या.

-----

दानापूर येथे राजीव गांधी यांना अभिवादन

दानापूर: येथे काॅंग्रेस पक्षाच्यावतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त गावात गरजूंना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावात गरजूंना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी नंदकिशोर नागपुरे, बबलूभाऊ वैलकर, समीर सौदागर, योगेश अट्टराळे, गौरव वानखडे, सुनीलकुमार बावस्कार, राहुल वाकोडे आदी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Divyang responds to vaccination at Danapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.