‘कोरोना’ला घाबरू नका; पण दक्षता हवी! - डॉ. मुकुंद अष्टपुत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 07:27 PM2020-06-06T19:27:08+5:302020-06-06T19:27:49+5:30
सुरक्षा नियमांचे पालन केल्यास कोरोनापासून स्वत:चा बचाव करू शकतो, अशी माहिती डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांनी ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.
अकोला : वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकलासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपल्याला तर कोरोनाची लागण झाली नाही ना, अशी शंका येते; परंतु सुरक्षा नियमांचे पालन केल्यास कोरोनापासून स्वत:चा बचाव करू शकतो, अशी माहिती डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांनी ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.
कोरोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा?
कोरोना विषाणूमुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो, याबाबत अजूनही निश्चित सांगता येत नाही; मात्र सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे, शिंकण्यातून, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबाद्वारे कोरोना विषाणू पसरतो.
कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी?
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील उपाय करावे.
श्वसनसंस्थेचे विकार असणाºया व्यक्तींनी संसर्गापासून सावध राहावे. हात वारंवार धुवावे. शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा. अर्धवट शिजलेले किंवा कच्चे मांस खाऊ नये.
फळे, भाज्या न धुता खाऊ नये.
रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
कोरोना व्हायरसची लागण झाल्यास साधारणत: सर्दी, खोकला, ताप येणे, थाकवा येणे, हगवण लागणे आदी लक्षणे आढळून येतात. ही सामान्य लक्षणे असली, तरी श्वसनास त्रास होणाºया व्यक्तींनी हा त्रास कशामुळे होत आहे, हे स्पष्ट होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोनाबाधित देशात प्रवास केलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोरोनाच्या रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेकडून काय तयारी?
कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसुलेट वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे. येथे रुग्णांची स्क्रिनिंग केली जाणार आहे. लक्षणे आढळताच रुग्णाचे नमुने नागपूरला पाठविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमली आहे. तोपर्यंत रुग्णांना अॅन्टिबायोटिक औषधोपचार केला जाणार आहे.
वतावरणातील बदलांपासून आरोग्याचा बचाव कसा करायचा?
वातावरणातील बदलांमुळे सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच लक्षणे असतात. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; पण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये, मास्कचा वापर करावा, वारंवार हात सबणाने धुवावा.
नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही; पण सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे. - डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसिन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.