अकोला: गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेतकºयांना चौथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मदत निधी महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला असून, मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.गतवर्षी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या पहिल्या यादीत अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १९९ कोटी रुपये मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ६१ लाख २ हजार ४५६ रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. उर्वरित चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत गत १० सप्टेंबर रोजी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळी मदतीचे वाटप रखडले होते. पाचही तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या याद्या व मदतीच्या रकमेचे धनादेश तहसील कार्यालयांमार्फत संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आल्यानंतर दुष्काळी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.