अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा मंगळवार,५ फेब्रुवारी थाटात पार पडला, अर्थमंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते २,९०२ पदवी,पदव्यूत्तर तसेच पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्राविण्यमध्ये यावर्षी मुलींनी बाजी मारली असून,२५ मुलींनी सुर्वण व रौप्य पदके प्राप्त केली.यामध्ये कृषी पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी लालसींग राठोड यांने पाच सुवर्ण व एक रौप्य तर स्नेहल विनय चव्हाण या कृषी पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थींनी तीन सुर्वण,तीन रौप्य पदकांसह तीन रोख पारितोषिकांची मानकरी ठरली.प्रचंड उत्साहात सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात आयोजित समारंभाला,२०६८ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.पदके प्रदान करताना विद्यार्थ्यांमध्ये प्रंचड उत्साह होता सर्वप्रथम पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आला. यामध्ये लालसींग राठोड या विद्यार्थ्यांला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले.पदव्यूत्तर शाखेच्या विविध पदके प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये सिद्दागणगम्मा के.आर. तीन सुवर्ण व दोन रौप्य, ज्योती देवी दोन सुवर्ण पदके तर दोन रोख पारितोषिके, रेश्मा रगडे एक सुवर्ण व रोख परितोषीक स्वाती पाटील एक सुवर्ण,सुचीता भोसले रौप्य, ए.ए.भोंडवे रोख पारितोषिक,आर्या क्रिष्णा रौप्य, निशिगंधा पाटील रोख पारितोषिक,पुजा चंद्रवंशी सुवर्ण पदक, राहुल बेलदार रोख पारितोषिक, दुप्पाला मनोज कुमार एक सुवर्ण एक रौप्य, राहुल माने रौप्य तर पदवीमध्ये अंजली बिजवे एक सुवर्ण, प्रज्ञा राऊत एक सुवर्ण, दुर्गा बघेल सुवर्ण पदक, अश्विनी झाडोकार सुवर्ण, अनुराधा चोपडे रौप्य, राहुल भड,दोन सुवर्ण,एक रौप्य, सैजल सेदाणी य् दोन रोख पारितोषिक पटकावले.समारंभाला कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, माजी विद्यार्थी,माजी कुलगुरू ंची उपस्थिती होती. दीक्षांत पिठावर माजी कुलगुरू डॉ. गोविंद भराड, डॉ. शरद निंबाळकर,डॉ. व्यंकटेश मायंदे यांच्यासह संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर,कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे,निम्न कृषी शिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज उंदिरवाडे, उद्यान विद्या विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे आदींची उपस्थिती होती.