घरातील एका सदस्याच्या वाढदिवसानिमित्त सहपरिवाराने केला देहदानाचा संकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 10:04 AM2017-11-30T10:04:10+5:302017-11-30T10:06:29+5:30

अकोल्यातील इंगळे परिवाराने वाढदिवासानिमित्त एक अनोखा उपक्रम समाजात रुजविण्याचा प्रथम प्रयत्न केला. घरातील एका सदस्याच्या वाढदिवशी संपूर्ण परिवारानेच देहदानाचा संकल्प केला.

Due to the death anniversary of a member of the family! | घरातील एका सदस्याच्या वाढदिवसानिमित्त सहपरिवाराने केला देहदानाचा संकल्प!

घरातील एका सदस्याच्या वाढदिवसानिमित्त सहपरिवाराने केला देहदानाचा संकल्प!

Next
ठळक मुद्देअकोल्यातील इंगळे परिवाराचा स्तुत्य उपक्रमदेहदान संकल्प अर्ज भरून उपअधिष्ठाता यांच्याकडे सोपविला

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हल्ली वाढदिवस पाश्चात्य संस्कृतीनुसार केक कापणे, नाच-गाणे अशाप्रकारे साजरे होताना दिसतात. मात्र, अकोल्यातील इंगळे परिवाराने वाढदिवासानिमित्त एक अनोखा उपक्रम समाजात रुजविण्याचा प्रथम प्रयत्न केला. घरातील एका सदस्याच्या वाढदिवशी संपूर्ण परिवारानेच देहदानाचा संकल्प केला.
शशीकांत इंगळे हे कापशी येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे जाऊन उपअधिष्ठाता डॉ. के.एस. घोरपडे यांच्यासमोर मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेतला. डॉ. घोरपडे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. शशीकांत इंगळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनीही देहदानाचा संकल्प केला.
शशीकांत इंगळे, चिंधाजी इंगळे, गंगाबाई इंगळे, दीपाली इंगळे, चंद्रकांत इंगळे यांनी देहदान संकल्प अर्ज भरू न उपअधिष्ठाता यांच्याकडे सोपविला. यानंतर इंगळे परिवाराला प्रमाणपत्र देऊन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी इंगळे परिवारासोबत संदीप बनकर उपस्थित होते.

Web Title: Due to the death anniversary of a member of the family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.