अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात रविवार, ९ मे रोजी रात्री १२ वाजेपासून १५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सहा दिवसांच्या कडक निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कामकाज सुरू राहणार असून, इतर विभागांचे कामकाज बंद राहणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात ९ मे रोजी रात्री १२ वाजेपासून सहा दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कडक निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध विभागांच्या कार्यालयांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांचे कामकाजही बंद राहणार आहे; परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून कडक निर्बंधांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कामकाज सुरू राहणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी शनिवारी आदेश काढला आहे.
कडक निर्बंधांच्या कालावधीत जि.प. आरोग्य, पाणीपुरवठा विभागाचे कामकाज राहणार सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:19 AM