येत्या महिन्यात वाढणार हवेतील धुळीचे प्रमाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 03:02 PM2019-11-15T15:02:20+5:302019-11-15T15:02:39+5:30

दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात हवेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत असल्याचे निरीक्षणही त्यामध्ये नोंदविण्यात आले आहे.

Dust levels to increase in coming months! | येत्या महिन्यात वाढणार हवेतील धुळीचे प्रमाण!

येत्या महिन्यात वाढणार हवेतील धुळीचे प्रमाण!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील १८ शहरांमध्ये होत असलेल्या हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिकांनी तयार केलेल्या कृती आराखड्यात विविध मुद्यांवर बोट ठेवण्यात आले. त्यामध्ये शहरांतील रस्त्यांवर असलेले अतिक्रमण, त्यातच रस्त्याच्या बाजूला पादचारी मार्गांचा अभाव असणे, या बाबींवरही उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले आहे. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात हवेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत असल्याचे निरीक्षणही त्यामध्ये नोंदविण्यात आले आहे.
पर्यावरणातील घटकांच्या प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातील हवेचे प्रदूषण घातक पातळीच्या वर जात असल्याचे अहवाल राज्यातील अनेक शहरांतून आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित महापालिकांच्या सहकार्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यातील उपाययोजना राबविण्यासाठी संबंधित महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी तयार केलेल्या कृती आराखड्यात प्रदूषणाची कारणे नमूद केली आहेत. त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी मंडळ व महापालिकांची आहे. अकोला शहरातील प्रदूषणाला रस्त्याच्या कडेलगत असलेली धूळ, वाहनांमध्ये इंधन ज्वलनातून निघणारा धूर, या दोन प्रमुख बाबींमुळे हवेचे प्रदूषण धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचते. विशेषत: डिसेंबर, जानेवारी महिन्यात त्यामध्ये प्रचंड वाढ होते.

अकोल्याची हवा प्रदूषणाची कारणे

  • रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनांतील इंधनाचे ज्वलन वाढते.
  • रस्त्यावरची धूळ तसेच इतर कारणांमुळे वातावरणात मिसळणारे घटक.
  • निर्माणाधीन बांधकामे, जुन्या इमारती पाडणे.
  • उपाहारगृहे, खानावळींमध्ये लाकूड, कोळशाच्या भट्ट्या लावणे.
  • आॅटोरिक्षामध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये रॉकेलचा वापर. त्यातून हवेत विषारी घटक मिसळतात.
  • रस्त्यालगतची धूळ. भूयारी गटार योजनेचा अभाव. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षांचा अभाव.
  • रस्त्यांची खराब अवस्था, सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव. नायगाव येथे कचरा पेटवून देणे. कचरा डम्प करणे.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसणे. त्यामुळे वैयक्तिक वापराच्या वाहनांमध्ये वाढ.
  • शहरालगत नियमबाह्यपणे झालेला वस्त्यांचा विस्तार.
  • मनपा हद्दीत वीज निर्मितीसाठी डीझल पंप वापराचे कोणतेही नियम नसणे. घरगुती स्वयंपाकासाठी धूर निर्माण करणाºया घटकांचा वापर.

Web Title: Dust levels to increase in coming months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.