लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्या इन्कम टॅक्स चौकातील मालमत्तांना हटविण्याची कारवाई मनपा प्रशासनाने सलग चौथ्या दिवशीही कायम ठेवली. मनपाच्या जेसीबीमुळे मालमत्तांचे जास्त नुकसान होत असल्याचे लक्षात येताच इन्कम टॅक्स चौकातील हॉटेल वैभवसह काही मालमत्ताधारकांनी मजुरांच्या माध्यमातून स्वत:हून बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. इन्कम टॅक्स चौक ते निशु नर्सरी कॉन्व्हेंटपर्यंतचा रस्ता १८ मीटर रुंद असताना अतिक्रमकांनी तब्बल नऊ मीटरचे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास येताच या रस्त्यावरील अतिक्रमित इमारतींचा सफाया करण्याचा निर्णय घेत प्रशासनाने कारवाईला सुरुवात केल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले. प्रशस्त रस्त्यांमुळे शहरातील विकास कामांना गती मिळते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकपर्यंतच्या मार्गाचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअर पर्यंत रस्त्यालगतच्या मालमत्तांमुळे रस्ता रुंदीकरणाला अडथळा निर्माण झाला होता. या ठिकाणी निर्माण होणार्या ‘बॉटल नेक’मुळे भविष्यात वाहतुकीची कोंडी व अपघात अटळ मानले जात होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने वस्तुनिष्ठ लिखाण केले. परिणामस्वरूप या मार्गावरील मालमत्ताधारक, लोकप्र ितनिधी, व्यावसायिकांनी शहर विकासाला हातभार लावत रस्ता रुंदीकरणासाठी मालमत्तांना हटविण्याची संमती दिली. ‘डीपी’ प्लॅननुसार २४ मीटर रुंद रस्त्याची गरज असल्यामुळे महा पालिका आयुक्त अजय लहाने यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करीत रस्त्यालगतच्या इमारतींना हटविण्याच्या कारवाईला २७ ऑक्टोबरपासून प्रारंभ केला. रविवारी सुटीच्या दिवशीसुद्धा मन पा प्रशासनाने कारवाईला पूर्णविराम दिला. सोमवारी महापारेषण कार्यालय ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतचा मार्ग बंद करीत मनपाने कारवाई सुरू केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शहर वाहतूक शा खेच्या पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.
हॉटेल वैभवचे बांधकाम तोडण्यास प्रारंभ‘डीपी’ प्लॅननुसार रस्त्याच्या एकाच बाजूने असणार्या मालमत्तांवर कारवाई करून जागा घेण्यापेक्षा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जागा घेण्याचा आग्रह इन्कम टॅक्स चौकातील काही हॉटेल व्यावसायिकांनी शासनाकडे लावून धरला होता. त्यावर प्रशासनाने तोडगा काढला. मालमत्तांवरील कारवाई अटळ असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर हॉटेल वैभवच्या संचालकांनी सोमवारी स्वत:हून इमारतीचे बांधकाम तोडण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले.
मालमत्ताधारकांची धावपळइन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंत रस्त्यालगत असणार्या काही मालमत्ताधारकांनी इमारतीचे एक -दोन फूट बांधकाम वाचविण्यासाठी विधिज्ञांकडे धावपळ केल्याची माहि ती आहे. त्यामध्ये मनपाच्या पॅनलवरील विधिज्ञांशीसुद्धा सल्लामसलत करण्यात आल्याची माहिती आहे.
मनपाच्या भूमिकेकडे लक्षमहापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौकातील बळवंत मेडिकलपर्यंत असणार्या काही मालमत्ताधारकांनी स्वत:हून बांधकाम पाडण्यास सुरुवात केली असली, तरी एवढय़ा मोठय़ा बांधकामासाठी अवघे एक-दोन मजूर लावून निव्वळ टाइमपास केला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. मुक्ता प्लाझा कॉम्प्लेक्समधील व्यावसायिकांनी मनपाच्या निर्देशांना ठेंगा दाखवत सोमवारी एक इंचही बांधकाम तोडले नाही. व्यावसायिकांच्या मर्जीनुसार बांधकाम तोडण्याची कारवाई केल्यास रस्ता रुंदीकरणाचे काम कधी सुरू होईल, असा सवाल उपस्थित झाला आहे.
निशु नर्सरी मार्गावर नऊ मीटरचे अतिक्रमणइन्कम टॅक्स ते निशु नर्सरी कॉन्व्हेंटपर्यंत १८ मीटर रुंद असणार्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यावसायिकांसह स्थानिक नागरिकांनी चक्क नऊ मीटर रुंद अतिक्रमण केल्याचे चित्र या कारवाईच्या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे वेळ न दवडता मनपा प्रशासनाने या मार्गावरील दुकाने, घरांना हटविण्याचा निर्णय घेत कारवाईला प्रारंभ केला आहे. इन्कम टॅक्स चौक ते निशु नर्सरी कॉन्व्हेंट ते पारस्कर शोरूम ते थेट राष्ट्रीय महामार्गा पर्यंत प्रशस्त रस्ता तयार केला जाईल.
या व्यावसायिकांच्या दुकानांवर गंडांतर!इन्कम टॅक्स चौक ते निशु नर्सरी कॉन्व्हेंटपर्यंतच्या मार्गावरील डॉ.वी.आर. देशमुख, आनंद बांगर, बी.आर. सातारकर यांच्या राहत्या घरांसह दुर्गा गॅस एजन्सी, कृष्णा हेअर सलून, किशोर पान मसाला, अकोला स्पोर्ट मेन्स वेअर, बेस्ट वाईन शॉप, सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल, श्रीराम पान मंदिर आदींसह इतर व्यावसायिकांच्या दुकानांवर गंडांतर आले आहे. सोमवारी दिवसभर संबंधित व्यावसायिकांनी ट्रक, टेम्पोद्वारे दुकानांमधील साहित्य हटविण्यास प्रारंभ केल्याचे दिसून आले.