शिक्षण विभागाने १00 टक्के अनुदानित शाळांची माहिती मागविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:52 PM2019-02-03T12:52:11+5:302019-02-03T12:52:25+5:30
अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाने २00८ पूर्वी १00 टक्के अनुदानावर असलेल्या शाळांची माहिती मागविली आहे.
अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाने २00८ पूर्वी १00 टक्के अनुदानावर असलेल्या शाळांची माहिती मागविली आहे. या शाळांना वेतनेतर अनुदान मिळणार असल्याने, त्यासाठी आवश्यक असणारी माहिती अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले आहेत.
२00८ पूर्वी १00 टक्के अनुदान मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाकडून वेतनेतर अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानासाठी आवश्यक माहिती तातडीने सादर करण्यात यावी, यापूर्वीसुद्धा शिक्षण विभागाने सूचना देऊन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती सादर केली नाही, ही गंभीर बाब आहे. एवढेच नाही, तर काही विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रपत्रामध्ये चुकीची माहिती सादर केली आहे. विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना ज्या महिन्यामध्ये सहावा वेतन आयोग लागू झाला आहे, त्या महिन्याची माहिती प्रपत्रामध्ये सादर करावी, ४ फेब्रुवारीपर्यंत ही माहिती मुख्याध्यापक व प्राचार्यांनी सादर न केल्यास त्यांच्या विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान देण्यात येणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी ही मुख्याध्यापक, प्राचार्यांची राहील, असा इशाराही शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)