शिक्षण विभागातील ३२ कर्मचाऱ्यांचे नोंदविले जबाब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 02:16 PM2019-05-04T14:16:43+5:302019-05-04T14:16:48+5:30
अकोला: सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांकडून लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत सातही पंचायत समिती स्तरावरील ३२ लिपिक कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी जबाब नोंदविले.

सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीसाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावरील शिक्षण विभागाच्या लिपिकांनी शिक्षकांकडून लाच घेण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या आदेशानुसार शिक्षण विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे. त्यामध्ये शुक्रवार ३ मे रोजी शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावरील ३२ लिपिक कर्मचाºयांचे जबाब प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग नोंदविले. याच प्रकरणात वेतन निश्चितीसाठी लिपिकांना लाच देणाºया हजारापेक्षा अधिक शिक्षकांची सुनावणीही शनिवार, ४ मे रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात होणार आहे.