महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात अकोल्याचे आठ खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 03:02 PM2019-05-11T15:02:07+5:302019-05-11T15:02:27+5:30
अकोला: तेलंगणा येथे आयोजित दहाव्या १३ वर्षांखालील राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील आठ खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
अकोला: तेलंगणा येथे आयोजित दहाव्या १३ वर्षांखालील राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील आठ खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यामध्ये तीन मुली व दोन मुले अकोला शहरातील आहेत. तीन मुले अकोट तालुक्यातील आहेत.
अकोल्यातील संचिता कुरवाळे, सानिका महाजन, नेहा अंभोरे, भार्गव देवचे, रुद्रप्रसाद डाबरे तर अकोटचे अभिषेक ढाले, तेजस मुडोकार, परिमल धर्मे यांचा महाराष्ट्र संघात समावेश आहे. या स्पर्धेकरिता अकोल्याचे सॉफ्टबॉल प्रशिक्षक रामेश्वर राठोड आणि अकोटचे मुकुल देशपांडे हे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. अकोटचा तेजस हा महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघाचा मुख्य पिचर आहे. कौशल्यपूर्ण खेळप्रदर्शन करीत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. परिमल याने उत्कृष्ट कॅचिंग व अप्रतिम कनेक्शन करीत सुंदर खेळप्रदर्शन केले. याआधी झालेल्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभागी होऊन दोघांनीही महाराष्ट्राला चौथे स्थान मिळवून दिले होते. अन्य खेळाडूंनीदेखील सर्वोत्तम कामगिरी केली. महाराष्ट्र संघ यावेळीदेखील उत्तम कामगिरी करील, अशी आशा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त नाजूकराव पखाले यांनी व्यक्त केली.