सहकारी संस्थांच्या निवडणुकाही आचारसंहितेच्या कक्षेत

By Admin | Published: November 15, 2014 11:57 PM2014-11-15T23:57:35+5:302014-11-15T23:57:35+5:30

पारदर्शक व भयमुक्त निवडणुकीचा प्रयास.

Election Code of Conduct of Co-operative Societies | सहकारी संस्थांच्या निवडणुकाही आचारसंहितेच्या कक्षेत

सहकारी संस्थांच्या निवडणुकाही आचारसंहितेच्या कक्षेत

googlenewsNext

नागेश घोपे/वाशिम
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूकांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नवी आचारसंहिता लागू केली आहे. लोकसभा, विधानसभा तथा स् थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेच्या धर्तीवर ही आचारसंहिता राहणार आहे. उमेदवारांच्या अफाट खर्चावर अंकुश ठेवण्यासह निवडणूक पारदर्शक, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा तथा विधानसभेच्या निवडणूकांसाठी निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येत असते. उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यापासून तर निवडणुका पारदर्शक व भयमुक् त वातावरणात पार पाडण्यात आचारसंहिता महत्वपूर्ण ठरते. सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र, उमेदवारांवर अंकुश ठेवणारी कोणतीही आचारसंहिता नसल्याने उमेदवार व संबधित पॅनलवर कुणाचेही नियंत्रण राहत नाही. यातूनच अव्वाच्या सव्वा खर्च करणे, मतदारांना आमिष देणे आदी विविध प्रकार घडतात. उमेदवार तथा पॅनलच्या या बेबंदशाहीला आळा घालण्यासाठी लोकसभा, विधानसभा तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या निवडणुकीतही आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. यामध्ये सहकारी संस्थांची निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवार अथवा पॅनलला १६ प्रकारच्या आचारसंहितेला बांधिल रहावे लागणार आहे. नव्या आचारसंहितेनुसार उमेदवारांच्या खर्चावर निबर्ंध घालण्यात आले आहेत. उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केल्यापासून, तर म तदान संपेपर्यंंत केलेल्या सर्व खर्चाचा हिशेब निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करावा लागणार आहे. पॅनलने संयुक्तपणे केलेला खर्च उमेदवारांमध्ये विभागून त्याचाही हिशेब द्यावा लागणार आहे. हिशेब न देणार्‍या उमेदवारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मतदानाच्या एक दिवस आधी, सायंकाळी पाच वाजता प्रचार बंद होईल. या काळात कोणतेही नवे निर्णय घेण्यास बंदी असेल; मात्र जुन्या योजना, कामे सुरू ठेवता येतील. संस्थांच्या नोकरदारांनी कोण त्याही स्थितीत निवडणूक प्रचारात किंवा पॅनेलच्या कामात सहभागी होऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सहकारी संस्थेच्या निवडणूका पारदर्शक व्हाव्या, यासाठी राज्य सहकारी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले याबाबतचे एक परिपत्रक जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाले असून, यानंतर जिल्ह्यात होणार्‍या प्र त्येक सहकारी संस्थेच्या निवडणूकीत ही आचारसंहिता लागु करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी सांगीतले.

Web Title: Election Code of Conduct of Co-operative Societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.