तेल्हारा तालुक्यातील २४ गावातील उपसरपंच निवडणूक दोन टप्प्यात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 09:23 PM2017-12-19T21:23:55+5:302017-12-19T21:24:11+5:30

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील नवनिर्वाचित २४ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच  निवडणुकीसाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रथम सभा २३ व २८ डिसेंबरला अशा दोन  टप्प्यात होत असून आहे. या सभेत उपसरपंचपदी कोण विराजमान होणार याचा निकाल  लागेल.

Elections in 24 villages of Telhara taluka will be held in two phases | तेल्हारा तालुक्यातील २४ गावातील उपसरपंच निवडणूक दोन टप्प्यात होणार

तेल्हारा तालुक्यातील २४ गावातील उपसरपंच निवडणूक दोन टप्प्यात होणार

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामपंचायतच्या विशेष सभांचे २३ व २८ डिसेंबरला आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील नवनिर्वाचित २४ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच  निवडणुकीसाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रथम सभा २३ व २८ डिसेंबरला अशा दोन  टप्प्यात होत असून आहे. या सभेत उपसरपंचपदी कोण विराजमान होणार याचा निकाल  लागेल.
 राज्य निवडणूक आयोग यांचे निवडणूक कार्यक्रमानुसार तेल्हारा तालुक्यातील २४ ग्राम पंचायतच्या सरपंचपदासाठी प्रथमच थेट जनतेतून निवडणूक प्रक्रिया पार पडली. यानंतर  आता २३ व २८ डिसेंबरला सदस्यांमधून उपसरपंचांची निवडणूक नवनियुक्त सरपंचांच्या  अध्यक्षतेखाली घेण्यात येणार्‍या सभेत केली जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात  २३ डिसेंबरला माळेगाव बाजार, शेरी बु. ,हिंगणी खुर्द, गाडेगाव, तळेगाव बु., भोकर,  दहीगाव, उकळी बाजार, टाकळी, चितलवाडी, तळेगाव पातरुडा, या ग्रामपंचायतींच्या उ पसरपंचांची निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात २८ डिसेंबरला मनात्री बु.,  धोंडा आखर, पिंपरखेड, भिली, बाभुळगाव, खापरखेड, वारखेड, कोठा, वरुडवडनेर,  तळेगाव खु., पिंपळद बु., दापुरा, पाथर्डी या गावांच्या उपसरपंचांची निवडणूक होणार आहे.  यासाठी २३ व २८ डिसेंबरला संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सदस्यांची  सभा होणार आहे.या निवडणुकीदरम्यान ज्या ठिकाणी सरपंच निवडून आलेला नाही. त्या  ठिकाणी विद्यमान उपसरपंच निवडणुकीसाठी अध्यक्षस्थानी राहतील असे निवडणूक  निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ. संतोष येपानीकर यांनी कळविले आहे.

Web Title: Elections in 24 villages of Telhara taluka will be held in two phases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.