बाळापूर : डिसेंबरमध्ये कार्यकाळ संपणाºया २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आॅक्टोबरमध्ये झाल्या होत्या. सरपंच थेट मतदारातून निवडल्या गेले होते. या सर्व ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक व नवीन सरपंचपदाचा पदभार ग्रहण सोहळा २३ व २७ डिसेंबर रोजी होणार आहे.तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आॅक्टोबर महिन्यात पार पडली. सरपंच विजयी झाल्याने आता २३ व २७ डिसेंबर रोजी होणाºया ग्रामपंचायतच्या पहिल्या सभेत सरपंचांचा पदभार ग्रहण सोहळा व उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून सरपंच उपस्थित राहतील. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत समसमान मते पडल्यास सरपंच मतदान करतील. सरपंचाचे मत मिळणारा उमेदवार उपसरपंच होणार आहे. २३ डिसेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक होणाºया गावांमध्ये कोळासा, मोरगाव सादीजन, बहादुरा, निंबी, सागद, हिंगणा निंबा, कारंजा रमजानपूर, बारलिंगा, सांगवी जोमदेव, सातरगाव, मांडवा बु., कळंबी महागाव, वझेगाव, शेळद यांचा समावेश आहे. २७ डिसेंबर रोजी मनारखेड, मोरझाडी, बळंबा बु., तामशी, भरतपूर, दधम बु., हसनापूर, कुपटा, नागद, टाकळी खोजबोड, मोखा, जोगलखेड, टाकळी निमकर्दा या गावांच्या उपसरपंचांची निवडणूक होणार आहे. या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून सरपंच राहतील. त्यांना निवडणुकीच्या कामकाजात ग्रामसेवक सहकार्य करणार आहेत.(तालुका प्रतिनिधी)
बाळापूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची निवडणूक २३ व २७ डिसेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 6:56 PM
बाळापूर : डिसेंबरमध्ये कार्यकाळ संपणाºया २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आॅक्टोबरमध्ये झाल्या होत्या. सरपंच थेट मतदारातून निवडल्या गेले होते. या सर्व ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक व नवीन सरपंचपदाचा पदभार ग्रहण सोहळा २३ व २७ डिसेंबर रोजी होणार आहे.
ठळक मुद्देतालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आॅक्टोबर महिन्यात पार पडली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत समसमान मते पडल्यास सरपंच मतदान करतील.ग्रामपंचायतच्या पहिल्या सभेत सरपंचांचा पदभार ग्रहण सोहळा व उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे.