अकोला : महावितरण कंपनीची केवळ अकोला परिमंडळांतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणीपुरवठा आणि नगरपालिका, महानगपालिकेच्या पथदिव्यांच्या वीज बिलाची एकूण थकबाकी ही ५०५ कोटींवर गेली आहे. त्यामुळे महावितरणचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी वीज ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
लॉकडाऊननंतर डिसेंबर २०२० अखेर परिमंडळातील वीज ग्राहकांकडे वाढलेल्या एकूण ५०५ कोटी १७ लाख रुपयांच्या थकबाकीमध्ये घरगुती ग्राहकांकडे २९८ कोटी ४० लाख, वाणिज्यिक ग्राहकांकडे ४७ कोटी ४ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ४५ कोटी ४९ लाख, पाणीपुरवठा योजनांकडे ९७ कोटी ७१ लाख आणि नगरपालिका, महानगरपालिकाकडील पथदिव्यांचे १६ कोटी ५३ लाख रुपयांचा समावेश असल्याची माहिती महावितरणने दिली आहे