अकोल्यात पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकीचे १७ हजार वीजग्राहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 06:19 PM2019-08-07T18:19:53+5:302019-08-07T18:20:00+5:30
७ हजारापेक्षा जास्त असे ग्राहक आहेत ज्यांच्याकडे वीजबिलाचे ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रूपयाची थकबाकी आहे.
अकोला: जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या विद्युत ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर वाढला असून, वसुलीसाठी महावितरणला मोठीच कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राककांपैकी १७ हजारापेक्षा जास्त असे ग्राहक आहेत ज्यांच्याकडे वीजबिलाचे ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रूपयाची थकबाकी आहे. वसूलीसाठी आव्हान ठरणाऱ्या या थकबाकीमुळे ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित न करणाºया अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय परिमंडळ प्रशासनाने घेतला आहे.
वाढत जाणाº्या थकबाकीमुळे जिल्हयाची वीज यंत्रणा कोलमडू नये आणि याचा फटका नियमित आणि वेळेवर वीज देयकांचा भरणा करणाºया ग्राहकांना बसू नये यासाठी मुख्य अभियंता अनिल डोये यांनी वसूलीचे कठोर पाऊले उचलत थेट कारवाईचा इशारा दिला आहे. जिल्हयाच्या घरगुती , वाणिज्यिक व औद्योगीक ग्राहकापैकी १७ हजार ६९९ ग्राहकाकडे प्रत्येकी ५ हजार रुपयांपेक्षा जास्त आणि एकून २६ कोटी ५९ लाख ७६ हजार रुपए वीजदेयकापोटी थकीत आहेत.
यामध्ये अकोला ग्रामीण विभागातील ५ हजार ६३६ ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ९ कोटी ७५ लाख ४३ हजार रुपए थकीत आहेत. अकोट विभागातील ४ हजार ३३७ ग्राहकांकडे ५ कोटी ५५ लक्ष ६७ हजार रुपए थकीत आहे. त्याच बरोबर अकोला शहर विभागातील ७ हजार ७२६ ग्राहकांकडे ११ कोटी २८ लाख ६६ हजार रूपयाची थकबाकी आहे.
थकबाकी वसूलीसाठी मुख्य अभियंता यांनी सर्व कार्यकारी अभियंते आणि उपविभागीय अभियंते याच्या बैठकीत सर्वांना टार्गेट दिले होते. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाºयांकडे दोनच दिवस शिल्ल्क असल्याने जिल्हयातील महावितरणच्या तीनही विभागाचे अधिकारी व कर्मचारी वसूलीसाठी फिरत आहे. अभियंता पवनकुमार कछोटही अनेक ठिकाणी वसूली मोहिमेत सहभागी होत असून स्वत: कारवाई करत कर्मचाº्यांना वसूलीसाठी प्रोत्साहित करत आहेत.