पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:32 PM2019-07-20T13:32:44+5:302019-07-20T13:32:48+5:30
अकोला : अंत्योदय योजनेंतर्गत जिल्ह्यात पात्र असलेला एकही लाभार्र्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी समाजिक बांधीलकीतून प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी केले.
अकोला : अंत्योदय योजनेंतर्गत जिल्ह्यात पात्र असलेला एकही लाभार्र्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी समाजिक बांधीलकीतून प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित लाभार्थींना शिधापत्रिका वाटप व उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल वानखडे उपस्थित होते. १५ जुलै ते १४ आॅगस्ट दरम्यान राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. पात्र लाभार्थी कुटुंबांना शंभर टक्के शिधापत्रिका वाटप करणे तसेच शिधापत्रिकांमध्ये पात्र व्यक्तींची नावे समाविष्ट करणे, नावे कमी करणे किंवा दुरुस्ती करणे तसेच अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र कुटुंबांचा समावेश करणे, केरोसीन वाटप करण्यात येत असलेल्या लाभार्थी कुटुंबांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन वाटप करणे इत्यादी कामांचा या अभियानात समावेश आहे. त्यानुषंगाने गावातील अशिक्षित, वृद्ध, दुर्लक्षित असलेल्या शेवटच्या पात्र घटकांना शोधून, त्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांनी सामाजिक बांधीलकी समजून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाºयांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थींना शिधापत्रिकांचे वाटप व उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू. काळे व आभार अन्न धान्य वितरण अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी केले. कार्यक्रमाला गॅस एजन्सीचे प्रतिनिधी व लाभार्थी उपस्थित होते.