शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
4
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
5
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
6
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
7
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
8
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
9
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
10
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
11
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
12
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
13
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
14
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
15
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
16
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
17
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
18
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
19
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
20
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

रोहित्रांची दुरुस्ती करून शेतक-यांना समस्यामुक्त करा!

By admin | Published: November 15, 2014 12:22 AM

ऊर्जा-विद्युतीकरण समन्वय समितीच्या सभेत खासदारांचे निर्देश.

अकोला: ग्रामीण भागात अनेक रोहित्र जळाले असून, नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाण्याची सुविधा असल्यावरही शेतकरी सिंचन करू शकत नाही. पाण्याअभावी पिके सुकत असल्यामुळे त्वरित नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्याचे निर्देश जिल्हा समन्वय समिती ऊर्जा व विद्युतीकरणच्यावतीने शुक्रवारी आयोजित सभेत खासदार व आमदारांनी दिले. जिल्हा समन्वय समिती ऊर्जा व विद्युतीकरणच्यावतीने विदर्भ चेम्बर ऑफ कॉर्मसच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. संजय धोत्रे होते. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, समितीचे सचिव विद्युत निरीक्षण विभागाचे अजित शुक्ल, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता शरद भिसे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अनिल चव्हाण, पारस वीज निर्मिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता रवींद्र गोहणे, पारेषणचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख होते. ग्रामीण भागात अनेक रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे पाण्याची सोय असल्यावरही विद्युत पुरवठय़ाअभावी शेतकरी सिंचन करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत काही महिन्यांपासून हा मुद्दा सर्वत्र गाजत आहे. त्याचे पडसाद बैठकीतही उमटले. त्यामुळे बंद पडलेले रोहित्र त्वरित दुरुस्त करून शेतकर्‍यांना या समस्येपासून मुक्त करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पायाभूत आराखड्याची कामे त्वरित मार्गी लावण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.