विदर्भस्तरीय युनानी काॅन्फरन्स उद्या
अकोला : यूनानी डॉक्टर्स असोसिएशनतर्फे रविवारी अकोल्यात विदर्भस्तरीय युनानी काॅन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. काॅन्फरन्सचे उद्घाटन पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पुणे, बेंगळुरू आणि मुंबई येथील युनानी चिकित्सकांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मौजदार खान यांनी दिली.
विद्यार्थिनींची आरोग्यविषयक काळजी घेण्याची गरज
अकोला : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच उच्च माध्यमिक शाळांसोबतच माध्यमिक शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत, मात्र बेफिकिरी विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकते.
धुळीमुळे विविध आजारांच्या समस्या
अकोला : शहरात उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ दिसून येत आहे. या धुळीमुळे श्वसनाशी निगडित आजारांसोबतच डोळे, केस आणि त्वचेशी निगडित विविध समस्या उद्भवत आहेत. यापासून बचावासाठी नागरिकांनी सन गॉगल्स तसेच दुपट्ट्याचा उपयोग करण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.