नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतरही फरपट
मागील वर्षभराआधी निवृत्त झालो. मला ग्रॅज्युइटीची रक्कम मिळाली आहे. तसेच सुट्यांची रक्कमही बाकी आहे. पेन्शनही अद्याप सुरू झाले नाही. एका महिन्याने पेन्शन सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
- एन. आर. नामने, निवृत्त कर्मचारी
निवृत्त होताना पीएफ व ग्रॅज्युइटीची रक्कम देणे आवश्यक आहे; परंतु ही रक्कम सेवानिवृत्त होताना मिळत नाही. काही दिवस उशिराने मिळते. सेवानिवृत्ती वेतन अद्याप सुरू होणे बाकी आहे.
- नितीन गवई, निवृत्त कर्मचारी
जिल्ह्यात आगार - ५
अधिकारी - ०३
कर्मचारी - ४८८
बसचालक - ४४८
वाहक - ४३८
सेवानिवृत्त झालेल्यांची देय असणारी विविध रक्कम काही महिन्यांपासून मिळाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. याकरिता संघटनेने पाठपुरावा केला असून ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळावी, याकरिता व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठविले आहे.
- रूपम वाघमारे, विभागीय सचिव, एसटी संघटना
एप्रिल २०२० पासून रक्कम थकली!
राज्य परिवहनच्या सेवेतून सेवानिवृत्ती किंवा मयत झालेल्या कर्मचाऱ्यांची रोखीकरणाची रक्कम, एकतर्फी करण्यात आलेल्या वेतनवाढीच्या फरकाच्या थकबाकी रकमेपैकी उर्वरित देय रक्कम, नवीन वेतनवाढीनुसार वाढीव उपदानाचा फरक काही कर्मचाऱ्यांना अद्याप देण्यात आला नाही. ही रक्कम एप्रिल २०२० पासून थकली आहे.