नव्या रेल्वेमंत्र्यांकडून विदर्भ यात्री संघाला अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:00+5:302021-07-12T04:13:00+5:30
नवीन रेल्वेमंत्री प्रवाशांच्या सोयीकडे लक्ष देतील व भारतीय रेल्वेला वेगळी ओळख निर्माण करून देतील, असे यात्री संघाच्या निवेदनात म्हटले ...
नवीन रेल्वेमंत्री प्रवाशांच्या सोयीकडे लक्ष देतील व भारतीय रेल्वेला वेगळी ओळख निर्माण करून देतील, असे यात्री संघाच्या निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाकाळात रद्द करण्यात आलेल्या प्रवासी गाड्या त्वरित पुन्हा सुरू कराव्यात, अत्यंत लोकप्रिय असलेल्या गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्स्प्रेस, भुबनेश्वर -एल टी टी एक्स्प्रेस, पुरी -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावर दोन मिनिटांचा थांबा देण्यात यावा, भुवनेश्वर ते मडगाव -वास्को दिगामा, भुवनेश्वर ते जोधपूर मार्गे अकोला नवीन प्रवासी गाड्या सुरू कराव्यात अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. नवीन रेल्वेमंत्री या मागण्या नक्कीच मान्य करतील अशी अपेक्षा संघाचे अध्यक्ष डॉ. रवी के. आलीमचंदानी यांच्यासह अशोक अग्रवाल, दीप मनवानी, विजय खंडेलवाल, डॉ. गद्रे, डॉ. कुलकर्णी , डॉ. दुष्यंत, राजू अकोटकर, मास्टर लवेश यांनी व्यक्त केली आहे.