ठळक मुद्देविद्यूत दाहिनीचा प्रस्ताव महापालिकेत धुळखात
- आशिष गावंडेअकाेला : शहरात गत वर्षभरापासून संसर्गजन्य काेराेना विषाणूची लागण हाेऊन मृत्यू झालेल्या ५८२ मृतदेहांपैकी ४६९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असता यासाठी मृतांच्या नातेवाइकांना १६ लाख ४१ हजार रुपये माेजावे लागले़. काेराेनाचा अनिश्चित कालावधी लक्षात घेता मृतांच्या नातेवाईकांचा वेळ वाचविण्यासाठी मनपा प्रशासनाने विद्युत दाहिनीचा अवलंब करण्याची गरज असताना मनपात विद्युत दाहिनीचा प्रस्ताव धूळखात पडून असल्याची माहिती समाेर आली आहे़.मागील वर्षभरापासून काेराेना विषाणूची लागण झाल्यामुळे आजवर अनेक तरुण व वयाेवृध्द नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेकांच्या कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे़ अनेक निष्पाप लहान मुलांच्या डाेक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे़ जिल्ह्यात काेराेनाचा पहिला पाॅझिटिव्ह रुग्ण ७ एप्रिल २०२० राेजी मनपा क्षेत्रातील बैदपुरा परिसरात आढळून आला हाेता़. त्यानंतर काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली हाेती. काेराेनाची पहिली लाट जून महिन्यापासून ओसरताच नागरिकांनी माेठ्या धुमधडाक्यात लग्न साेहळे व विविध कार्यक्रम साजरे केले़ त्याचे परिणाम जानेवारी महिन्याच्या अखेरनंतर समाेर आले़ फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांच्या संख्येत माेठी वाढ झाल्याचे चित्र हाेते़ एकूणच, गतवर्षभरापासून ते मे महिन्याच्या कालावधीपर्यंत शहरात तब्बल ५८२ जणांचा मृत्यू झाला़ यापैकी ४६९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर उर्वरित ११३ मृतदेहांना दफन करण्यात आले़.अंत्यंसंस्कारासाठी ३ हजार ५०० रुपये खर्चअंत्यसंस्काराच्या साहित्यासाठी काही स्मशानभूमीत ३ हजार ९०० रुपये तर काही स्मशानभूमीत ३ हजार ५०० रुपये माेजावे लागले़ यासाठी आजवर मृतांच्या नातेवाईकांना १६ लाख ४१ हजार रुपये माेजावे लागले़.विद्युत दाहिनीसाठी ५५ लाखांचा खर्चकाेराेनामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेता मनपा प्रशासनाने विद्युत दाहिनीचा प्रस्ताव तयार केला़. विद्युतद्वारे भस्मीकरण करणारी दाहिनी ४५ लाख रुपयांपर्यंत असून एलपीजीवर क्रियाशील हाेणाऱ्या दाहिनीसाठी ४७ लाख रुपये माेजावे लागतील़ जीएसटी तसेच इतर कर व दाहिनी बसविण्यासाठी ५५ ते ५८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे़.एलपीजी दाहिनीसाठी कमी शुल्कविद्युत व एलपीजीवर आधारित दाहिनीमध्ये ४५ ते ५० मिनिटात मृतदेहाची राख हाेते़ एलपीजी दाहिनीचा वापर केल्यास नागरिकांना १५०० ते १८०० रुपये शुल्क अदा करावे लागेल़. त्या तुलनेत विद्युत वाहिनीसाठी विजेचा जास्त वापर हाेणार असल्याने किमान तीन ते साडेतीन हजार रुपये शुल्क द्यावे लागेल़. मनपाने या प्रस्तावावर सखाेल चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित आहे़.काेराेना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी १६ लाख रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 10:11 AM