नाल्याच्या पाणी संचयावर प्रयोगशील कास्तकार करतोय नफ्याची शेती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:50+5:302021-03-29T04:12:50+5:30

पातूर: नाल्याचे खोलीकरण करून पाण्याचा संचय केला. शेतात पारंपारिक पारंपारिक पद्धतीने शेणखत घालून, बाजारातील मागणीनुसार पीक पद्धतीची सांगड घालत, ...

Experimental tax collector is doing profitable farming on nala water storage! | नाल्याच्या पाणी संचयावर प्रयोगशील कास्तकार करतोय नफ्याची शेती!

नाल्याच्या पाणी संचयावर प्रयोगशील कास्तकार करतोय नफ्याची शेती!

Next

पातूर: नाल्याचे खोलीकरण करून पाण्याचा संचय केला. शेतात पारंपारिक पारंपारिक पद्धतीने शेणखत घालून, बाजारातील मागणीनुसार पीक पद्धतीची सांगड घालत, सोयाबीन, गहू, हरभरा आणि कलिंगडाची नफ्याची शेती येथील प्रयोगशील शेतकरी विजयसिंह गहिलोत करीत आहेत.

पातूर तालुक्यात शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राचार्य व संस्थाप्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. आता त्यांनी शेतीत करीत असलेल्या विविध प्रयोगांमुळे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. शेतीत नफा कसा मिळवता येईल. त्याबरोबरच विषमुक्त शेती करून उत्पादन कसे वाढविता येईल. यावर त्यांचा विशेष भर आहे.

दररोज सकाळी उठून शेताच्या बांधावर मॉर्निंग वाॅक करतात. गेल्यावर्षी शेतात पुरेसं पाणी नव्हतं. त्यामुळे त्यांनी लगतच्या कृषी विभागाने बांधलेल्या नाल्याचे स्वखर्चाने खोलीकरण करून पाण्याची साठवण केली. साठवलेल्या पाण्यातून शेतातील पिकांना पाणी दिले.

त्यामुळे शेतात त्यांनी एकरी १०.५ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले. शेतकऱ्यांनी सरासरीएकरी पाच क्विंटल एवढेच उत्पादन झाले. या तुलनेत गहिलोत यांनी दुपटीने अधिक उत्पादन घेतले.

दोन एकरात त्यांनी २१. ५० क्विंटल उत्पादन घेतले. त्याबरोबरच लसूनाची लागवड करून अधिक उत्पादन घेतले. यासोबतच त्यांनी शेतात कलिंगडाची लागवड केली आहे. शेतात, कृषी उत्पादने, रासायनिक खतांचा वापर न करता, केवळ शेणखत वापरून सेंद्रिय पद्धतीने शेती करून प्रयोगशील शेतकरी प्राचार्य विजयसिंह गहिलोत यांनी कृषी क्षेत्रात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली. विविध यशस्वी प्रयोग करून त्यांनी नफ्याची शेती करून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

फोटो:

Web Title: Experimental tax collector is doing profitable farming on nala water storage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.