नापास झाल्याने, वडील बोलले; मुलीने घर सोडले
By नितिन गव्हाळे | Published: July 2, 2023 02:12 PM2023-07-02T14:12:30+5:302023-07-02T14:16:19+5:30
या प्रकरणात गुन्हा दाखल केला. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना तीन मुली असून, मोठी मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे तंत्रशिक्षण घेत आहे.
अकोला - छत्रपती संभाजीनगर येथे तंत्रशिक्षण घेणारी मुलगी पहिल्या सेमिस्टरला नापास झाल्याने, वडील रागाच्या भरात मुलीला बोलले. वडिलांचे बोल जिव्हारी लागल्याने, १७ वर्षीय मुलीने रागाच्या भरात घर सोडले. तिचा शहरात शोध घेतला. परंतु मिळून न आल्याने, वडिलांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणात गुन्हा दाखल केला. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना तीन मुली असून, मोठी मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे तंत्रशिक्षण घेत आहे. ती पहिल्या सेमिस्टरला नापास झाल्याने, तू अभ्यासच केला नाही. अभ्यास केला असता तर नापास झाली नसती, असे वडील तिला बोलले. याचा राग मनात धरून मुलगी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.